पैसाच पैसा, हा ₹1.85 चा शेअर पोहोचला तब्बल 97 रुपयांवर..
Paisaach Paisa, this share of 8 1.85 reached as high as 97 rupees.
शेअर (shares) बाजारात गुंतवणूक करायची असेल पेनी स्टॉक हे असे स्टॉक (stock) आहेत जे खूप स्वस्त आहेत आणि ज्यांचे बाजार मूल्य कमी आहे. आजकाल अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सनी (multibagger stock) गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
वाचा –
25 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्टॉकला (stock) पेनी स्टॉक म्हणतात. हे स्टॉक खूप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य देखील कमी असते. या शेअर्सची (shares) किंमत साधारणपणे ₹25 च्या खाली असते.
टाटा टेलिसर्व्हिसेस (Tata Teleservices) लिमिटेडच्या शेअरने अवघ्या दीड वर्षात त्यांच्या भागधारकांना 5150% परतावा दिला आहे. ₹1.85 चा शेअर पोहोचला 97 रुपयांवर या मल्टीबॅगर स्टॉकची (multibagger stock) किंमत ₹1.85 प्रति शेअर होती. या स्तरावरुन आता ही किंमत ₹97.25 (एनएसईवर 25 नोव्हेंबर 2021 रोजी बंद किंमत) वर पोहोचली आहे. अलीकडेच शेवटच्या पाच व्यवहाराच्या सत्रात या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 21.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. जी आतापर्यंतच्या सत्रात 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटपर्यंत गेली आहे.
वाचा –
गेल्या महिन्यात 53 रुपयांवरून 97 रुपयांवर –
गेल्या महिनाभरात हा टेलिकॉम पेनी स्टॉक (Telecom penny stock) जवळपास 53 रुपयांवरुन 97 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत 85 टक्क्यांची वाढ या शेअरमध्ये झाली आहे. 6 महिन्यात 600% रिटर्न गेल्या सहा महिन्यांच्या हा पेनी स्टॉक जवळपास 13.55 रुपयांवरुन 97 रुपयांवर पोहोचला आहे. या दरम्यान भागधारकांना 600 टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे. गेल्या एका वर्षात या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने (Multibagger penny stock) 7.45 रुपयांवरुन 97.25 रुपयांची पातळी गाठली आहे.
या कालावधीत जवळपास 1200 टक्क्यांची वाढ झाली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यात दीड वर्षापूर्वी 1 लाख गुंतवले असतील तर त्याच्या एक लाखाचे आजपर्यंत 52.50 लाख रुपये झाले असते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –