कृषी बातम्या

संकटावर मात करत या गावाने रचला अंजीरात “नंबर वन ” होण्याचा मान!

Overcoming the crisis, this village has the honor of being "number one" in figs!

अतिवृष्टीमुळे एकीकडे अंजिराच्या खट्ट्या बहरास मार बसल्या कारणाने त्यातूनही वेगळ्या मार्ग काढण्याचा अंजिर बागायतदारांनी निर्णय घेतला. हिवाळी हंगाम म्हणजेच खट्टा हंगाम पदरात पाडून घेतला . परंतु, निम्याहून अधिक शेतकऱ्यांनी उन्हाळी म्हणजेच मिठा हंगाम धरुन ठेवला गेला. त्याचा फायदा झाला की अंजीरला बाजारभावचा चांगलाच फायदा घेता आला.

पुरंदर तालुक्यात आजच्या स्थितीला सर्वाधिक अंजीर उत्पादन व सुमारे 7.50 कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न काढण्याचा, मान “सोनोरी” गावाने मिळवला सर्वाधिक महत्वाचे म्हणजे एकेकाळी सोनोरी गाव टँकरग्रस्त होते.

तेथील शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध व्यवस्थापन केले त्याकरिता, शेततळी करण्यात आली. त्यामुळे भूजल पातळीही सुधारली. जिथे टँकरग्रस्त असणारे हे गाव पाटपाणी देऊ लागले. तेथील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरत, ठिबक सिंचनाचा वापर करू लागले. त्यामुळे पाण्यामध्ये बचत होऊ लागली पाण्याच्या अभावामुळे उन्हाळी हंगाम न करणारे अंजीर बागायतदार आता तिथे आता अंजिराच्या बागा फुलू लागल्या केवळ पाणी टंचाईमुळे उन्हाळी मीठा बहराचा नाद सोडून पावसाळी खट्टा बहर घेण्याकडे कल वाढला होता.


👉👉 अंजीर बागांवर अशी आली संकटे


📌 यापूर्वी दुष्काळ, टंचाई यामुळे गाव बेजार झाले होते. दोन वर्षे अतिवृष्टीचा तडाखा त्यांना बसला.

📌 वातावरण बदलामुळे विविध कारणामुळे बागांवर रोग पडू लागला त्यामध्ये तांबेरा, मावा, तुडतुडे, पिवळा – लाल कोळीचा प्रादुर्भाव यामुळे अंजिर बागायतदार हैराण झाले.

📌 कोरोनाच्या काळात वाहतुक, विक्री साखळी तुटली गेली

.

👉👉 अशी कशी केली संकटावर मात📌जलसंधारणातून नवीन बंधारे बांधण्यात आले.

📌 शेततळे व विहिरींची संख्या देखील वाढवण्यात आली.

📌 “पाणी आडवा पाणी जिरवा “ही योजना राबवण्यात आली.

📌 दोन वर्षापूर्वी टँकरग्रस्त या गावामध्ये जलसाठा वाढवण्यावर भर दिला गेला.

📌 अंजिराच्या उन्हाळी व पावसाळी दोन्ही हंगामाचे योग्य नियोजन केले.

📌 अंजीर बागेची योग्य व्यवस्थापन व निगा राखली गेली.

📌 आंबा बाजारात येण्यापूर्वी, कसे अंजीर बाजारात येईल याकडे लक्ष दिले.

📌 सोयीनुसार सासवड, पुणे, मुंबई घाऊक बाजारपेठेत शोधली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button