योजना

उरले फक्त आठ दिवस! घ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या 2.67 लाख रुपयांचा फायदा…

Only eight days left! Take advantage of Pradhan Mantri Awas Yojana of Rs 2.67 lakh ...

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत( Pradhan Mantri Aawas Yojana scheme) घर खरेदीदारांना देण्यात येत असलेल्या अनुदानाची मुदत संपुष्टात येणार आहे. तुम्हांला या योजनेअंतर्गत 2.67 लाख रुपयांचा लाभ घ्यायचा असेल, तर 31 मार्चपर्यंत तुमच्याकडे मुदत आहे. या योजनेअंतर्गत सरकार घर खरेदीदारांना 2.67 लाख रुपयांचे अनुदान देते. या योजनेची मुदत 31 मार्च नंतर उपलब्ध होणार नाही.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हे अनुदान भारतातील कोणत्याही शहरात घर खरेदीसाठी दिले जाते. या योजनेचा उद्देश शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्याचा आहे.

📌 अनुदान मिळवण्यासाठीच्या अटी:

👉 लाभार्थीच्या नावे कुठेही घर नसावे. दुसरीकडे जर आपण आधी सबसिडी घेत असाल तर तुम्हाला इतर गृहकर्जाला अनुदान मिळणार नाही.
👉 जर विवाहित असाल तर संयुक्त गृहकर्जावर अनुदान घेऊ शकता. पण फक्त एक अनुदान मिळणार आहे.

📌 योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

👉 प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड अशी कागदपत्रे असावीत.

👉 आपल्याकडे मतदान ओळखपत्र किंवा आपला पत्ता असल्याचा कोणताही पुरावा असावा.

👉 उत्पन्नाचा फॉर्म म्हणून तुम्हाला सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट दाखवावे लागेल.

👉ज्या मालमत्तेसाठी कर्ज घेत आहात त्या मालमत्तेवर विक्री करार नोंदणी प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे असली पाहिजेत.

📌 किती अनुदान उपलब्ध आहे

👉 तुमचे उत्पन्न सहा लाख रुपयापर्यंत असेल तर तुम्हाला सबसिडी 6.5 टक्के मिळेल.

👉 जर उत्पन्न बारा लाख रुपये पर्यंत असेल तर 4 टक्के सबसिडी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button