कृषी बातम्या

‘पंतप्रधान पीक विमा’ योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी उरला, फक्त 1 दिवस…

Only 1 day left to register for 'Prime Crop Insurance' scheme

राज्य सरकार (State Government) व केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांसाठी नवीन योजना (Plan) नेहमीच राबत असते, जेणेकरून त्यांचे उत्पन्नातील जोखीम कमी होऊन त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारावी याकडे लक्ष केंद्रित करत असते. अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राबवित आहेत ज्याचे नाव आहे, पंतप्रधान फसल बीमा योजना, (Prime Minister’s Crop Insurance Scheme,) या योजनेचा उद्देश आहे जेणेकरून पिकांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना विम्याच्या स्वरूपात रक्कम देता यावे. थोडक्यात पिकांना विम्याचे कवच दिले जाते.(Crops are covered by insurance.)

पंतप्रधान पीक विमा योजना वैशिष्ट्ये (Prime crop insurance plan features)

  • ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे.
    कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात.
  • शेतकऱ्यांनी खरिप हंगामातील पिकांच्या विमा संरक्षित (Insurance cover) रकमेच्या 2 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे.
  • पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. खरिपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

” या” कारणांमुळे नुकसानभरपाई मिळते..

खरिप हंगामात पेरणी केल्यापासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर , जमीन जलमय होणे, भुस्खलन होणं, पावसातील खंड, कीड, रोग यामुळे उत्पादनात आलेली घटक, हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यानं होणारं नुकसान याची जोखीम योजनेत घेतली जाते.

खरिप हंगामातील (Kharif season) हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं होणारं नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचं काढणीनंतर होणारं नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं पिकांच नुकसानं याची जोखीम पीक विमा योजनेत घेतली जाते.

हे ही वाचा :

खरीप पिक विमा अर्ज भरताय का? मग नक्की वाचा ही माहिती उपयुक्त ठरेल…

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! ‘बाजार समितीच्या’ माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार, 1 लाख कोटी रुपये वाचा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button