दिनंदीन बातम्या

Marriage Certificate| घरबसल्या मिळवा मॅरेज सर्टिफिकेट|

Marriage Certificate| लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. कायदेशीररित्या वैवाहिक (matrimonial) जीवन सुरू करण्यासाठी लग्न नोंदणी करणे गरजेचे आहे. आता तुम्हाला ग्रामपंचायतीच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही! महाग्राम सिटिजन कनेक्ट नावाच्या ॲपद्वारे तुम्ही घरबसल्या सहजपणे मॅरज सर्टिफिकेट मिळवू शकता.

ऑनलाइन मॅरेज सर्टिफिकेट कसे मिळवायचे?

  1. महाग्राम सिटिजन कनेक्ट ॲप तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करा आणि लॉग इन करा.
  2. नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून खाते तयार करा.
  3. तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर पाठवलेल्या OTP द्वारे लॉग इन करा.
  4. ॲपच्या डॅशबोर्डवर असलेल्या “विवाह नोंदणी” पर्यायावर क्लिक करा.
  5. *नवरा आणि नवरीची माहिती, *विवाहाचे ठिकाण आणि वेळ भरा.
  6. आधार कार्ड, रेशन कार्ड सारखी महत्त्वाची कागदपत्र अपलोड कर.
  7. साक्षीदारांची माहिती आणि कागदपत्रे (Documents) अपलोड करा.
  8. लग्नपत्रिका आणि लग्नाचे फोटो अपलोड करा.
  9. अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक मिळवा.
  10. अर्ज क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन तुमच्या ग्रामपंचायतीत जा.
  11. कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट मिळेल.

वाचा:Free Toilet| स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत मोफत शौचालय योजना 2024: पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे|

महत्त्वाचे मुद्दे:

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाग्राम(Mahagram) सिटिजन कनेक्ट ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे.
  • सही आणि पूर्ण माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक नोंद करून घ्या.
  • ग्रामपंचायतीत आवश्यक (necessary) कागदपत्रांसह हजर रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button