बाजार भाव

Onion Rate | कांदा महागाईवर सरकारची दुधारी तलवार! शेतकऱ्यांसह सामान्यांनाही दिलासा; वाचा नेमका निर्णय काय?

Government's double-edged sword on onion inflation! relief to farmers as well as common people; Read What exactly is the decision?

Onion Rate | देशभरात कांद्याचे भाव झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे दर वधारल्यामुळे सर्वसामान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेत, एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात वाढलेली (Onion Rate) कांद्याची मागणी कमी करण्यासाठी केंद्र सरकार आपल्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणणार आहे. तसेच, अनेक राज्यांमध्ये हा स्कॉट जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सरकार 16 शहरांमध्ये बफर स्टॉक विकणार

दिवाळीपूर्वीच कांद्याबरोबरच इतर भाज्यांनाही मागणी वाढली आहे. त्यामुळे काही दिवसांत कांद्याचे दर दुपटीनं वाढले आहेत, तर इतर भाज्यांचे भाव पुन्हा एकदा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यानं सांगितलं की, सध्याच्या महागाईला आळा घालण्यासाठी सरकार आपल्या बफर स्टॉकमधून सुमारे 16 शहरांमध्ये कांद्याची विक्री सुरू ठेवेल. यामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद, इंदूर, नागपूर, जयपूर, चंडीगढ, कानपूर आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे.

वाचा : Tata Motors Singur Plant | सिंगूर प्रकरणात टाटा मोटर्सचा विजय! पश्चिम बंगाल सरकारला ७६६ कोटींची नुकसानभरपाई देण्याचे आदेश…

कांदा महागाईचे कारण

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, एकंदरीत यंदा कमी पडलेल्या पावसामुळे कांद्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, ऐन सणासुदीच्या काळात कांद्याची मागणी वाढल्यानेही दर वाढले आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीतील कमकुवत पावसानं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रमुख पुरवठादारांमध्ये खरीप कांदा पिकाचं नुकसान केलं आहे. त्यामुळे कांद्याच्या काढणीला उशीर झाला, तर हिवाळी पिकांचा साठा जवळपास संपला असून त्यामुळेच दर पुन्हा वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारचा निर्णय दिलासादायक

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. बफर स्टॉकमधील कांद्याची विक्री सुरू झाल्यास कांद्याचे भाव कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा :

Web Title : Government’s double-edged sword on onion inflation! relief to farmers as well as common people; Read What exactly is the decision?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button