कृषी बातम्या

कांद्याच्या भावात अचानक घसरण! जाणून घ्या: त्यामागील कारणे…

Onion prices plummet! Find out the reasons behind it

सध्याच्या स्थितीमध्ये किरकोळ बाजार मध्ये कांद्याची (Of onions) विचारणा केली असता, प्रति किलो 40 रुपये किलोच्या आसपास कांदा मिळत आहे परंतु याचा खरंच फायदा शेतकऱ्यांना होतो का? सध्या शेतकऱ्यांना (To farmers) कांदा प्रति क्विंटल 1400 रुपये प्रमाणे बाजारभाव मिळत आहे. सध्या देशातील बर्‍याच भागात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याच्या किंमतीत घसरण (Falling) पाहायला मिळत आहे.

किरकोळ बाजारपेठेत (In the retail market) व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशामध्ये एवढी मोठी तफावत का याचा विचार केला असता, यामध्ये मध्यस्थ आणि मोठ्या मंडईच्या व्यापारी वर्ग मध्येच मलई चट करतात, परिणामी काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांच्या हातावर पैसे काही येत नाही.

हे ही वाचा : Technology : टेलिग्रामचे ढासू फीचर्स! एकाच वेळी 30 जणांशी व्हिडिओ कॉल वर बोलता येणार…

गेल्या पंधरा दिवसापासून कांद्याचे दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, मागील काही दिवसात राज्यांमधील कांद्याची आवक सर्वसाधारण होती मात्र काही ठिकाणी आवक मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहे, अहमदनगर येथील काही बाजारपेठेमध्ये कोरोनामुळे कांद्याचे लिलावचे लिलाव सहा दिवस होण्याऐवजी दोन दिवस होत आहेत, याचा शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका बसत आहे.

हे ही वाचा :भारतीय लोक स्मार्टफोन खरेदी करताना, ‘या’ गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देतात..

भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International markets) टक्कर देण्यासाठी चांगल्या प्रतवारीचा आणि कमी दरामध्ये पाकिस्तानचा कांदा उपलब्ध झाला आहे. दर वर्षी किमान 15 दशलक्ष मेट्रिक टन कांदा विकला जातो. मात्र सध्या कांद्याची मागणी घटल्याने याचा परिणाम काही ठिकाणी कांद्याच्या दरावर दिसत आहे, असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता, शेतकऱ्यांनी आपला कांदा टप्यात विका. नाशिक, पुणे, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये कांद्याची चांगली बाजारपेठ आहे. त्याचा काही शेतकरी फायदा घेत आहे

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

सिताफळ लागवड करा व मिळवा भरघोस उत्पन्न ! जाणून घ्या; सिताफळ लागवडीची संपूर्ण माहिती…

यंदाच्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन विक्रमी होणार का? सोयाबीन उत्पादकांनी घ्या ‘ही’ काळजी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button