कृषी बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय ढेंगळ्यांचा फटका ! कांदा उत्पादनात 35 टन घट…

Onion growers hit by Dhengals !! See 35% decline in onion production.

पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये कांदा पिकांचे व रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याला बाजार भाव नसला तरीही कांदा रोपांचा तुटवडा असूनही शेतकऱ्यांनी या वर्षी कांद्याची लागवड केली होती.

मात्र बोगस बियांच्या परिणामामुळे कांदा पिकांमध्ये ढेंगळा कांद्याचे प्रमाण अधिक आल्यामुळे 35 टक्केपर्यंत कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे.

हे चित्र जास्त शिरूर व बाकीच्या तालुक्यात पाहण्यास मिळत आहे खरीप व रब्बी हंगामातील उत्पादनामध्ये हे दिसून आले आहे.
पावसाळी कांद्याचे बियाणे रब्बी हंगामात वापरल्यामुळे देखील हे नुकसान झाले आहे असे काही जानकरांचे म्हणणे आहे तसेच हे बियाणे व रोपे बोगस असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम पाहावयास मिळत आहेत.

कांद्याच्या पिकांना बाजार भाव नसल्याने तसेच मोठ्या प्रमाणावर ढेंगळे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी निश्चितच या वर्षी संकटात सापडणार आहे असे चिन्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button