योजना

One Rupee Insurance | एक रुपया विमा योजना; जनतेचा पैसा सरकरच्या मित्र कंपन्यांना मिळाला का?

One Rupee Insurance | One Rupee Insurance Scheme; Did the government's friendly companies get public money?

One Rupee Insurance | महाराष्ट्र सरकारने एक रुपया विमा योजना आणली. त्या अंतर्गत पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी (One Rupee Insurance) सरकारच्या मित्र कंपन्यांना मिळाला का? हा सवाल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “पिकाचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत कळवा, असे विमा कंपन्या म्हणतात. पण, ७२ तासानंतरही विमा कंपन्यांच्या फोन आणि दारे-खिडक्या बंद आहेत. शेतकऱ्यांना विमा मिळणे कठीण झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला आहे. बँकांकडून कर्जाचा तगादा लावला जात आहे. आज त्यांचा कुणीही वाली नाही. शेतकरी आपले अवयव विकायला तयार झाले आहेत.”

वाचा : New Soybean Varieties | सोयाबीनच्या नवीन जाती; उत्पादन वाढवा आणि रोग कमी करा! जाणून घ्या कसे …

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. या सरकारला कळवळा असेल तर पंचनाम्याचे थोतांड बंद करून कर्जमाफी करायला हवी. एक रुपया विमा योजना आणि कर्जमाफी या दोन गोष्टी केल्या तर शेतकऱ्यांची होरपळ थांबेल.”

उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर सरकार कोणता प्रतिसाद देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title : One Rupee Insurance | One Rupee Insurance Scheme; Did the government’s friendly companies get public money?

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button