योजना

‘ वृक्ष ‘ लागवड करण्यासाठी मिळणार शंभर टक्के अनुदान! पहा : कोणती आहे ही योजना व कसा कराल अर्ज…

One hundred percent subsidy for planting 'trees'! See: What is this plan and how to apply

केंद्र व राज्य विविध योजना राबवत असते,अशाच एका योजना माहिती आपण घेणार आहोत की ज्यामध्ये मिळणार आहे शंभर टक्के अनुदान या योजनेचे नाव आहे” वृक्ष लागवड योजना” बांधावरील जागा पडीक जमीन असेल तर शासनाद्वारे 31 प्रकारचे विविध लागवडीकरता शंभर टक्के अनुदान मिळत आहे त्यामध्ये चिंच, जांभूळ, चंदन,महोगणी, सुबाभूळ, अशा प्रकारच्या झाडांचा देखील समावेश होणार आहे.चारोळी आवळा, हिरडा बेरडा,सीताफळ, बांबू आणि आंबा काजू,फणस व शेवगा,कढीपत्ता,हादगा इत्यादी अशा प्रकारच्या विविध प्रकारचे अशा वनस्पतींचा व वृक्षांचा समावेश करण्यात आलेला आहे.


📌 कुठे कराल अर्ज.


वृक्ष लागवड 100% अनुदान मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना तो मिळणार आहे. हे अनुदान मिळण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत येथे मध्ये जाणे आवश्यक आहे तेथेच आपल्याला हा अर्ज करता येईल. हे अर्ज सध्या सुरू करण्यात आले आहे तुम्ही मे महिन्याच्या अखेरपर्यंत आपण हा अर्ज करू शकतो.


📌 या योजनेस पात्र व्यक्ती


अनुसूचित जाती अनुसूचित जमाती.

भटक्या जमाती.

दारिद्र रेषेखालील लाभार्थी.

शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेली व्यक्ती.

इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी.

लहान व सीमांतभूधारक शेतकरी.


📌 या योजनेच्या अटी पुढील प्रमाणे:


👉 इच्छुक लाभार्थीकडे स्वतःच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.

👉 लाभार्थींनी हा अर्ज ग्रामपंचायत कडे दाखल करावा.

👉 ग्रामपंचायतने ग्रामसभा घेऊन कोणाला व किती लाभ घेता येईल याबाबत ग्रामसभा घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button