योजना

MAHA DBT | एक शेतकरी एक अर्ज अनेक योजना’ लाभार्थी होण्यासाठी ‘हे’ करा…

One FARMER devised many schemes Beneficiaries do this...

एक शेतकरी एक अर्ज व अनेक योजना, म्हणजेच महाडीबीटी (MAHA DBT) योजनेचे पोर्टल काही दिवसांपूर्वी तात्पुरते स्वरूपात बंद करण्यात आले होते. बऱ्याच शेतकऱ्यांना अर्ज भरायचे होते.तसेच बरे शेतकर्‍यांना त्यामध्ये अधिक माहिती भरायची होती. त्यामुळे बरेच सारे शेतकरी पोर्टल कधी चालू होणार या प्रतीक्षेत होते. व आता, ‘एक शेतकरी एक अर्ज व अनेक योजना’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल पुन्हा शेतकरी मित्रांच्या सेवेस उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही विविध योजनेचा लाभ घेऊ शकता.


राज्य शासनाच्या महाडीबीटी कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी करण्याची (MAHA DBT) सोय उपलब्ध करण्यात आली. या अर्ज मध्ये, मागील वर्षी महाडीबीटी वर अर्ज केला आहे. परंतु त्यांची कोणते योजनेत निवड झाली नाही. अश्या शेतकरी मित्र निशुल्क बदल करू शकतात.त्याच्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.


यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या संकेत स्थळी जाऊन, ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. हा अर्ज शेतकरी त्यांच्या मोबाईल संगणक, टॅबलेट, लॅपटॉप, सामुहीक सेवा केंद्र पंचायत मधील संग्राम केंद्र इत्यादी ठिकाणी जाऊन अर्ज करू शकतात. व्यक्तिगत लाभार्थी होऊ इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी संकेत स्थळावर यांचा आधार क्रमांक द्यावा लागेल. या वापरकर्त्यांनाकडे आधारकार्ड नसेल, त्यांनी प्रथम आधार कार्ड केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावी. सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलवर नमूद करून अर्ज करण्यात येईल.


अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टल मध्ये आधार कार्ड क्रमांक नोंदणीकृत करणे आवश्यक आहे.
अर्ज भरत असताना कोणत्या प्रकारची अडचण आल्यास 020 25511479 या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button