Omicron BA 2 Variant | ओमायक्रॉन बीए 2 व्हेरिएंट आता करतोय पोटावर हल्ला, रुग्णांना ‘हे’ आजार होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिला सतर्कतेचा इशारा
गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना संसर्गने (Corona virus) थैमान घातले आहे. या संसर्गामुळे सामान्य जनजीवन विस्कळित झाले.
Omicron BA 2 Variant | जरी या संसर्ग पसरण्याची भीती कमी झाली आहे. तरी देखील कोरोना नवनवीन रूप घेऊन रुग्णांमध्ये वाढ करत आहेत. मोठं मोठे प्रगतशील देश देखील घाबरतात. कोरोनाच्या पाठोपाठ ओमायक्रॉन आपली हजेरी लावली. त्यानंतर आता त्याचा सब व्हेरिएंट ओमायक्रॉन बीए 2 (Omicron BA 2 Variant) धुमाकूळ घालत आहे. त्यासह आशिया आणि युरोप यांसारख्या अनेक देशात या रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्याचमुळे आता नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाची चौथी लाट येण्याची तज्ज्ञांला आहे भीती
सब व्हेरिएंट ओमायक्रॉन बीए 2 रुग्णांमध्ये पसरत आहे. त्या पाठोपाठच कोरोनाची चौथी लाट येईल अशी भीती देखील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
शरीराच्या ‘या’ भागावर होतोय परिणाम
सब व्हेरिएंट ओमायक्रॉन बीए 2 हा रुग्णांच्या फुप्फुसावर नाही तर वेगळ्याच भागांवर परिणाम करत आहे. असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. खरं तर, सब व्हेरिएंट ओमायक्रॉन बीए 2 हा रुग्णांच्या पोटावर जास्तीत जास्त प्रमाणत परिणाम करत आहे.
वाचा: Gudi Padwa Muhurat | गुढीपाडव्यामुळे आरोग्यावर होतो ‘असा’ परिणाम, शेतकऱ्यांसाठीही आहे महत्वाचा..
पोट दुखण्यासह ‘या’ समस्येलाही द्यावे लागेल तोंड
ज्या रुग्णांना सब व्हेरिएंट ओमायक्रॉन बीए 2 ची लागण झाली आहे त्यांना पोटाचे आजार उद्भवू शकतात. त्या रुग्णाच्या पोटात दुखु शकते, मळमळ आणि अतिसार होऊ शकतो. यामुळे रुग्णांच्या शारीरिक अवस्थेत चांगलाच परिणाम दिसू शकतो. याचमुळे आता तज्ज्ञ या व्हेरिएंटची लागण होण्यापूर्वीच काळजी घेण्याचा इशारा देत आहेत. पोटाच्या दुखण्यासह रुग्णांना अशक्तपणा थकवा आल्यासारखे देखील जाणवेल. त्यामुळे रुग्णांच्या शारीरिक अवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल देखील जाणवू शकतो.
वाचा: ‘या’गोष्टी केल्याने होणार नाही कोरोना, वाचा आयुष मंत्रालयाच्या नवीन गाईडलाईन्स…
नागरिकांना घ्यावी लागणार अधिक काळजी
या व्हेरिएंट रुग्णांच्या पोटात दुखेल असा पण याचा परिणाम आतड्यावर देखील होण्याची शक्यता देखील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पोटा संदर्भात कोणतेही दुखणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अंगावर दुखणे काढू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनच्या BA.2 व्हेरिएंटची लक्षणे (Omicron BA 2 variant Symptoms) सौम्य असल्याचे सांगितले आहेत. मात्र, नागरिकांनी या भ्रमात न राहता काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण ओमायक्रॉनच्या BA.2 व्हेरिएंटचा परीणाम इतर देशांतील रुग्णांवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: