योजना

आता शेतमालावर सुद्धा मिळणार कर्ज; “या” योजनेबद्दल माहीत आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती..

“शेतमाल तारण कर्ज योजना” (Agricultural Mortgage Loan Scheme) ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल तारण ठेवून त्यावर कर्ज घेता येते. या शेतमाल तारण कर्ज (Commodity mortgage loan) योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊ.

वाचा –

शेतमाल तारण कर्ज योजना –

शेतकऱ्यांना असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच त्यातून निघालेला शेतमाल साठवणुकीसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसतात. या योजनेअंतर्गत शेतात पिकवलेला शेतमाल काही काळ साठवून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्याला चांगला भाव मिळतो. या दृष्टिकोनातून शेतकर्‍यांना शेतमालासाठी चांगला भाव आणि पर्यायाने त्यांना नफा मिळावा या एका दृष्टिकोनातून शेतकरी तारण कर्ज योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

वाचा –

या शेतमालावर कर्ज मिळणार –

शेतमाल तारण योजना अंतर्गत कर्जसाठी मूग, बेदाना, सोयाबीन, गहू, उडीद,चना बाजरी,काजू बी आणि हळद इत्यादी शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे. योजना बाजार समिती मार्फत राबवली जाते. शेतमाल तारण ठेवून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड सहा महिन्याच्या आत करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याजदर सवलत देण्यात येते.

शेतमालाचा प्रकार व त्यानुसार कर्जाची मुदत व व्याजदर

शेतमालप्रकार–मका, ज्वारी, बाजरी आणि गहू
कर्जाचीमर्यादा– एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ( 500 रुपये प्रति क्विंटल किंवा प्रत्यक्ष बाजार भाव यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम)

मुदत– सहा महिने
व्याजदर– सहा टक्के
शेतमाल प्रकार – सोयाबीन, तुर, सूर्यफूल,उडीद, करडई, भात,मुग, हळद, चना
कर्ज वाटपाचे मर्यादा – प्रत्यक्ष बाजारभावानुसार किमतीच्या 75 टक्के रक्कम

मुदत – सहा महिने
व्याजदर – सहा टक्के
शेतमाल प्रकार – बेदाणा
कर्ज मर्यादा – एकूण किमतीच्या कमाल 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 50 हजार प्रति मेट्रिक टन यातील कमी असणारी रक्कम.
मुदत – सहा महिने
व्याज दर – सहा टक्के.

कर्जाची परतफेड मुदत आणि व्याजदर

शेतमाल तारण कर्ज योजनेच्या कर्जाची परतफेड सहा महिने म्हणजे 180 दिवस असून तारण कर्जास व्याजाचा दर 6 टक्के आहे. बाजार समिती कडून कृषी पणन मंडळास तीन टक्के प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड ठरवून दिलेल्या मुदतीत कर्ज न फेडल्यास व्याज सवलत शेतकऱ्याला मिळणार नाही. मुदतीनंतर सहा महिन्यांपर्यंत आठ टक्के व्याज दर व त्यापुढील सहा महिन्यांकरिता 12 टक्के व्याजदर आकारला जातो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button