आता तुरीचे उत्पादन वाढणार; असे करा तूर व्यवस्थापन,कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
यंदाच्या खरीप हंगामात काही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तूर आता काढणीला आलेले नाही त्यामुळे या संधीचा फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे. तूर काढणीचा वेळ आहे त्यामुळे पेरणीपासून तुरीचे उत्पादन कसे काढता येईल या कृषी सल्ल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तूर व्यवस्थापन व्यवस्थित केल्याने तूर उत्पादक शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात. तुरीचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषितज्ज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी महत्वाचा सल्ला देखील दिला आहे. याविषयी सविस्तर माहिती पाहुया…
वाचा –
कृषी तज्ज्ञांच्या सल्ला, असे वाढवा तूर उत्पादन –
वाढत्या पीकाचे शेंडे खोडल्याने तुरीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. तुर बहरात आली की केवळ वाढ होते. त्यामुळे तुरीचे शेंडे खोडल्यास फांद्या फुटतात व खोडही मजबूत होते. अधिकच्या फांद्या फुटल्या की शेंगाही मोठ्या प्रमाणात लागतात. तुरीची केवळ ऊंची न वाढता झुडपाप्रमाणे घेर वाढतो. त्यामुळे उत्पादनही वाढते. यासंबंधी कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आलेले आहे. शेंगा खोडण्याची पध्दत ही सोपी असली तरी योग्य वेळी करणे आवश्यक आहे.
वाचा –
उत्पादन दीड पटीने वाढेल, अशी करा लागवड
तुरीची पेरणी ही दोन्ही झाडांमध्ये योग्य अंतर राहील याच पध्दतीने करायला हवी. सव्वा ते दीड फुटाचे अंतर राहिल्यास योग्य वाढ होते. जेवढी विरळ तुर तेवढेच अधिकचे उत्पादन होते.
खताचे व्यवस्थापन –
तुरीची खुडणी म्हणजे पीक बहरात असते. त्याच दरम्यान, खत व्यवस्थापन करुन स्फुरद अन्नद्राव्य दिल्यास फुलोर आणि शेंगाची लागवणही वाढते. जेव्हा पीक कळी अवस्थेत असते तेव्हा जमिनीत ओल असेल तर उत्पादनातही वाढ होते. त्यामुळे ही काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा