योजना

आता शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकणार; पहा SBI ने काढलेली नवीन कर्ज योजना..

Now the farmer's son will also be able to go abroad for education; See the new loan scheme drawn up by SBI.

सामान्य घरातला मुलगा असो किंवा शेतकरी घरातला. या सर्व मुलांचं स्वप्नं पूर्ण होणार आहे. सहज परदेशात जाऊन शिक्षण घेता येणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने नवीन शैक्षणिक (education loan) कर्ज सुरू केले आहे. SBI Global Ed-Vantage SBI Global Ed-vantage असे त्याचे नाव आहे. ही कर्ज सुविधा (loan facility) परदेशात शिक्षण घेणार्यासाठी आहे. या योजने अंतर्गत कोणताही विद्यार्थी (minimum) किमान 7.50 लाख आणि जास्तीत (maximum) जास्त 1.50 कोटी रुपयांचे कर्ज (loan) घेऊ शकतात.

कर्ज योजनेंतर्गत विद्यार्थी 8.65% दराने (8.65% interest rate) कर्ज घेऊ शकतील. मुलींना विशेष सवलत दिलेली आहे, विद्यार्थ्यांच्या तुलनेत एसबीआयने 0.50 टक्के सवलत दिली. म्हणजेच मुलींना 8.15 टक्के दराने कर्ज दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थि 6 महिन्यांनी कर्ज फेडू शकतो तसेच 15 वर्षाच्या आत कर्ज फेडण्याची मुदत असणार आहे. कर्जामध्ये अगदी क्षुल्लक रक्कमसुद्धा असणार आहे जाण्याच्या पासपोर्ट पासून गणवेश पर्यंत.

गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रतील किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या?

कर्जासाठी लागणारी कागदपत्रे –

10 वी 12 वी, पदवीची मार्कशीट, निकाल, प्रवेशपत्र, ऑफर लेटर, ओळखपत्र, कोर्ससाठी प्रवेश खर्च, शिष्यवृत्ती, विनामूल्य शीपच्या ऑफरची प्रत गॅप असेल तर गॅप प्रमाणपत्र विद्यार्थी, पालक, सहकर्जदार, हमीदार यांचा प्रत्येकी एक पासपोर्ट आकाराचा फोटो, विद्यार्थ्याचे पालक किंवा हमीदार यांचे 6 महिन्यांचे बँक खाते विवरण. विद्यार्थी, पालक, सह-कर्जदार, हमीदार यांचे पॅन आधारची प्रत, जेव्हा विद्यार्थी भारत सरकारच्या विविध योजनांमध्ये सबसिडी घेतो तेव्हा हे अनिवार्य आहे.

नियमित पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा हे शिक्षण या देशांमध्ये कर्ज काढून शिक्षण घेऊ शकता या देशांमध्ये ही कर्ज योजना काम करेल, त्यामध्ये अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोप, जपान, सिंगापूर, हाँगकाँग आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button