इतर

बिग ब्रेकिंग: आता नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतूनच विधेयकाला मंजुरी ? वाचा सविस्तर

Eknath Shinde | आता नगराध्यक्षांच्या निवडीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
2006 साली थेट नगराध्यक्ष करावा असा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी थेट नगराध्यक्ष निवड व्हावी याबाबत विधेयकावर विधानसभेत प्रस्ताव मांडला होता. तर नगराध्यक्षांची (mayor election) निवड ही जनतेून होईल. मात्र यासाठी विरोधकांकडून विरोध करण्यात आला. पण आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: शिक्षकच दारू पिऊन शाळेत येऊ लागले तर? शाळकरी मुलांच भविष्य धोक्यात, पहा व्हिडिओ

काय म्हणाले मुख्यमंत्री?
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “थेट नगराध्यक्ष करावा असा निर्णय 2006 साली घेतला. असे निर्णय आताच आपण बदलला असे नाही. नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला, तो एका मंत्र्यांचा निर्णय नसतो तो सर्व मंत्र्यांचा असतो. एखादा गुंड एखाद्या वार्डात पैशाच्या जीवावर निवडून येऊ शकतो, पण पूर्ण शहरात पैशाच्या जीवावर तो निवडून येऊ शकत नाही. मग यावर मुख्यमंत्री जनतेतून निवडा अशी मागणी विरोधकांनी केली. मुख्यमंत्र्यांची जनतेतून निवड कसी करायची, मग घटनेत बदल करायचा का? आमचं सरकार घटनेनुसारच काम करत आहे.”

वाचा: बिग ब्रेकिंग: जिल्हा बँक राज्य बँकेत होणार विलीन? जाणून घ्या केंद्र सहकार खात्याने का घेतला महत्वपूर्ण निर्णय

विधेयकाला मंजुरी?
या दरम्यान महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक 2022 संमत करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. ते विधेयक बहुमताने मंजूर केलं. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, “नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला म्हणजे तो एका नगरविकासाचा नसतो तर तो सरकारचा निर्णय असतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आपण अनेक निर्णय घेतले. त्यानंतर पुनर्विचार करून ते बदलले. पूर्वी शिवसेना-भाजपा युतीने घेतलेले निर्णयही महाविकास आघाडी सरकारने बदलेले होते.”

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button