ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Investment | अरे वाह! केवळ 500 रुपये गुंतवून लखपती होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या काय आहे प्लॅन…

इन्व्हेस्टमेंट प्लॅन गरजेचा –

सर्वांचे काही ना काही स्वप्ने असतात जी पूर्ण करायची असतात . पण सर्वात मोठा प्रश्न हा ‘ पैसा ‘ असतो . दररोज नोकरी करून किती जरी मेहनत केली तरी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण रावत असतो. त्यासाठी मोठी रक्कम हळूहळू जोडत असतो . मात्र, ज्यावेळी आपल्याकडे एखादी मोठी रक्कम नसते त्यावेळी अडचण निर्माण होते. त्यामुळे भविष्यात कोणतेही मोठं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याची तयारी आतापासूनच करायला हवी. ही तयारी ( SIP ) सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान ( Systematic Investment Plan) म्हणजेच च्या रुपात असू शकते. एसआयपीमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला छोटी-छोटी रक्कम जमा कराल तर अगदी सहजपणे तुम्ही पैसे जमा करु( Investment) शकता. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला केवळ 500 रुपये गुंतवणूक कराल तर मोठ्या रक्कमेचे मालक बनाल.

वाचा: हवेत उडणाऱ्या बसच्या संकल्पनेनंतर; नितीन गडकरी करणार ई- हायवे; पेट्रोल डिझेलला करणार हद्दपार..

सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान घ्या आणि मिळवा लाखो –

जर तुम्ही 11 वर्षे प्रत्येक महिन्याला सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपीमध्ये केवळ 500 रुपये जमा केले तर तुमच्याकडे 5 लाखांहून अधिक रुपये जमा होतील. 11 वर्षे म्हणजेच 132 महिन्यांत तुमची एकूण गुंतवणूक 66,000 रुपये इतकी होईल. जर तुम्हाला 11 वर्षांच्या काळात 30 टक्के दराने दर वर्षाला रिटर्न्स मिळाले तर तुम्हाला एकूण 4,47,206 रुपये रिटर्न्स मिळतील. म्हणजेच 11 वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण 513208 रुपये( Investment) मिळतील .

वाचा: बाप रे! पालघरमध्ये होतोय चक्क भुताचा व्हिडिओ व्हायरल; विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ

काय आहे एसआयपी ‌-

( SIP ) सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणजे म्युच्युअल फंड्सने गुंतवणुकीसाठी सुरू केलेला मार्ग आहे ज्यात आपण एखाद्या म्युच्युअल फंड स्किम्स मध्ये नियमित कालावधीने एक निश्चित रक्कम गुंतवू शकता – जसे महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यांतून एकदा, अशाने आपल्याला एकरकमी गुंतवणूक करावी लागत नाही. यासाठी किमान रु. 500 दरमहा रक्कम गुंतवली जाऊ शकते आणि हे एखाद्या आवर्त ठेवी सारखेच आहे.SIP (Mutual Fund) मध्ये गुंतवणूक करण्याचा एक पर्याय आहे. सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लानमध्ये साप्ताहिक, मासिक किंवा तिमाहीच्या आधारे तुम्ही गुंतवणूक करु शकता. एक्सपर्ट्सच्या मते, एसआयपीमध्ये तुम्ही जेवढे जास्त वेळ गुंतवणूक कराल तेवढे रिटर्न्स तुम्हाला जास्त मिळतील. अनेक असे एसआयपी प्लान आहेत जेथे गुंतवणुकदारांना 25 ते 30 टक्के रिटर्न्स ( Investment)मिळाले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button