ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला
ट्रेंडिंग

आत्ता शेतकऱ्यांना मिळणार मासिक पेन्शन; पहा काय आहे ‘शेतकरी मानधन योजना’…

Now farmers will get monthly pension; See what is 'Shetkari Mandhan Yojana'

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी चांगला योजना राबवित असते, केंद्र सरकारचे सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रदान करत असते. परंतु सध्या केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या वृद्ध काळासाठी पेंशन सुविधा पीएम शेतकरी मानधन योजना (PM Farmers Honorarium Scheme) सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ वर्षाच्या पुढे हे मानधन मिळणार आहे. जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे खातेधारक (Account holder of Prime Minister’s Kisan Sanman Nidhi Yojana) आहेत त्या शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्राची पूर्तता करावी लागणार नाही. तुमचे थेट रजिस्ट्रेशन पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेतसुद्धा (Prime Minister’s Farmers Honorarium Scheme) होईल. या योजनेच्या अनेक सुविधा आणि फायदे आहेत.

शेतकऱ्यांचे जीवन कष्टमय असते, मात्र वयोवृद्ध काळात जीवन सुखकर होण्यासाठी सरकार त्या दृष्टीने पावले उचलत आहे, योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षापर्यंतचा कोणीही शेतकरी गुंतवणूक करू शकतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 हजार रुपयांपर्यंत मासिक पेंशन मिळते.

वाचा : ‘या’ सरकारी योजनेद्वारे तुम्ही कमवू शकता लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती…

मानधन योजनेसाठी गरजेचे कागदपत्र (Documents required for honorarium scheme)
1. आधार कार्ड
2. ओळख पत्र
3. वयाचा दाखला/जन्माचा दाखला
4. उत्पन्नाचा दाखला
5. शेतजमीनीची माहिती
6. बँक खाते पासबुक
7. मोबाईल नंबर
8. पासपोर्ट साइज फोटो

वाचा : ‘या’ सरकारी योजनेतून महिलांना मिळणार दरमहा चार हजार रुपये कमवायची संधी वाचा काय आहे ही योजना…

या योजने सहभाग नोंदवण्यासाठी, पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारे हप्त्यातून ही रक्कम कापली जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जवळचे पैसे देण्याची गरज नाही. केंद्र सरकार मार्फत जो दोन हजार रुपयांचा हप्ता पैसे कधी होणार आहे, साठ वर्षानंतर पेन्शन (Pension) स्वरूपात तुम्हाला मिळू शकतात.

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button