आता शेतकरी (Farmers) सुद्धा स्वतःची कंपनी (Company) स्थापन करू शकता. कृषी विभाग अशा कंपनीसाठी शेतकऱ्यांना मदत देखील करत असते. कृषी (Agriculture) विभागाच्या ‘आत्मा’ अंतर्गत अशा अनेक योजना आहेत ज्याचा शेतकरी (Farmers) फायदा घेऊ शकतात. पाहुया कोणकोणत्या योजना आहेत? ज्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया…
वाचा- ताजे उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कांदा या पिकांचे बाजार भाव जाणून घ्या सविस्तर..
तरुणांसाठी या उद्योगाची उत्तम संधी-
“आत्मा” योजनेअंतर्गत कंपनीची (Company) स्थापना करू शकता या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कर्ज, विमा व सामूहीक शेती करून त्या शेती (Agriculture) मालाला मार्केट मिळवून देणे हा उत्पादक कंपनी मागचा हेतू आहे. शेती आणि शेतीपूरक (Agriculture and agricultural supplements) उद्योग करण्यासाठी तरुणांना ही उत्तम संधी आहे. कृषी विभाग तसेच शेतकऱ्यांनी स्व:ताहून अशा कंपन्यांची स्थापना ही केलेली आहे. राज्यात 3081 कंपन्यांची नोंद झालेली आहे. यापैकी 2214 ह्या कंपन्या स्व:ता शेतकऱ्यांनी स्थापीत केलेल्या आहेत. या कंपनीची नोंद ही मिनीस्टर ऑफ कोर्परेट (Minister of Corporate) अफेअर्स यांच्याकडे होते. याकरीता कंपनीतील 10 सदस्य हे शेतकरीच असणे आवश्यक आहे. ज्याचा लाभ शेतीशी निगडीत व्यवसाय (Business) वाढवण्यासाठी होणार आहे.
वाचा – सोयाबीन पिकावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव; नियंत्रण कसे कराल? वाचा सविस्तर माहिती..
पात्रता –
१) एका कंपनीची स्थापना करण्यासाठी कमीत-कमी 10 शेतकरी आसावे.
२) दोन वेगवेगळ्या कंपन्याही एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करु शकतात.
रजिस्ट्रेशन असे करा –
1) कंपनीचे रजिस्ट्रेशन संधी (Company registration opportunity) लेखापाल, कंपनी सेक्रेटरी कींवा वकीलामार्फत करता येणार आहे.
2) शेतकरी उत्पादक (Farmer grower) कंपनीत महिला शेतकऱ्याचा सहभाग असल्यास योजनांचा लाभ अधिक प्रमाणात घेता येणार आहे.
3) कंपनी स्थापनेचा प्रस्ताव संबंधित सी.ए. संधी लेखापाल यांच्यामार्फत मिनीस्टर ऑफ कोर्परेट (Minister of Corporate) अफेअर्स यांच्याकडे वर्ग होतात आणि त्यानंतर कंपनी स्थापन करण्याची म्हणजेच सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पेरेशन चे परवानगी पत्र हे आठ दिवसामध्ये दिले जाते.
4) संबंधित माहीती कृषी (Agriculture) अधिकारी जुबेर पठान यांनी दिली असून ते बीड येथील कृषी (Agriculture) विभागाच्या आत्मा विभागात कार्यरत आहेत.
आवश्यक कागदपत्रे:
1) पॅन कार्ड
2) आधार
3) मतदान ओळखपत्र
4) ड्राइविंग लायसन्स
5) बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक
6) कंपनीच्या डायरेक्टरचे लाईट बिल
7) 10 सभासद त्यापैकी 5 डायरेक्टर
8) 10 शेतकऱ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो व मोबाइल नंबर.
वाचा –
- केंद्रसरकारने “या” डाळींच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय; पहा निर्णयाबद्दल सविस्तर माहिती…
- फक्त 12 रुपयांत 2 लाख रुपयांचा विमा संरक्षण; अगदी कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो..
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..