कृषी बातम्या

बिग ब्रेकींग! आता हस्तलिखित जुने फेरफार बंद; कसे असतील नवे फेरफार? वाचा महत्वपूर्ण निर्देश

Property Card | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना (Agri News) आपल्या जमिनीचा मालकी हक्क दाखवण्यासाठी जमिनीचा पुरावा प्रचंड महत्त्वाचा असतो. अन्यथा शेतकऱ्यांची (Department of Agriculture) जमीन बळकावली जाते. अशी अनेक प्रकरणे समोर देखील आली आहेत. म्हणूनच सरकारने या फसवणुकीला आला घालण्यासाठी राज्यात डिजिटल सेवा (Digital Services) आणली आहे. याद्वारे शेतकरी (Agriculture) आपल्या जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा ऑनलाईन स्वरूपात ठेऊ शकतील. याबाबतचं एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

वाचा: ब्रेकींग! शेतकऱ्यांवर आता वीज दरवाढीचं मोठं संकट; युनिटामागं होणारं ‘इतक्या’ रुपयांची वाढ

जुने फेरफार बंद
शासकीय कमजासाठी लागणारे जुने हस्तलिखित फेरफार देण्यासाठी बंद करण्यात आली आहे. याचासंदर्भात आज 6 डिसेंबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाच्या (Department of Agriculture) माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या डिजिटल सेवा प्रदान करण्यात येत आहेत.

बिग ब्रेकिंग! प्रोत्साहन अनुदाची दुसरी यादी ‘या’ तारखेला होणारं प्रकाशित; प्रशासनाने दिली माहिती

कसे असतील नवे फेरफार?
भूमी अभिलेखाकडून सातबारा उतारे (Satbara Utare) व प्रॉपटी कार्डवर (Property card)11 अंकाचा भूधारक क्रमांक सर्व दिसेल. ज्यामुळे त्यावर दिसणाऱ्या क्यूआर कोड आणि युएलपीएन आयडी क्रमांकावरून (ULPN ID number) त्याची सत्यता तपासणे शक्य होणार आहे. आता 1 जानेवारी 2023 पासून राज्यात डिजिटल फेरफाराला सुरुवात होणार आहे. आता हस्तलिखित स्वरूपाचे कोणतेही प्रॉपर्टी कार्ड देण्यात येऊ नये असे निर्देशही देण्यात आले आहेत.

वाचा: महत्त्वपूर्ण शासन निर्णय! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारं सोयाबीन अनुदान, जाणून घ्या…

कोणत्या गोष्टी होणार सोप्या?
• भूआधार क्रमांक शासकीय अथवा व्यावसायिक कामांसाठी वापरता येणार आहे.
• यातून कागदपत्रांची सत्यता पडताळणी करणे शक्य होणार आहे.
• एका मिळकतीच्या कागदपत्रे वेगवेगळ्या बँकांमध्ये गहाण ठेऊन कर्ज उचलण्याला आळा बसणार आहे.
• एकच जमिनींची दोन ते तीन जणांना विक्री करण्यासह फसवणुकीचे प्रकार थांबणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Now off the old manipulation of the manuscript; How will the new changes? Read important instructions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button