आता शेतीचा विकास होणार, कृषी यांत्रिणीकरण योजनेला 80 टक्के अनुदान; या आहेत अटी, लवकर अर्ज करून घ्या लाभ…
शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. काळाच्या ओघात शेती पध्दतीमध्ये बदल होऊन शेतकरी आता आधुनिक यंत्राकडे (Modern machinery) वळत असताना दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने सरकारही वेगवेगळ्या योजना राबवत आहे. तसेच जनजागृती झाल्यामुळे शेतकरी लाभ घेत आहेत. ( Krushi Yantrikikaran Yojana 2021) सर्वाद जलद गतीने रुजलेली योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण (Krushi Yantrikikaran). या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? यासाठी काय नियम अटी आहेत याची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया..
वाचा –
कृषी यांत्रिणीकरण योजना 2021 –
Krushi Yantrikikaran Yojana 2021 कमी खर्चात जास्तीत जास्त शेती उत्पादनासाठी यांत्रिकीकरण आवश्यक आहे. कृषी यांत्रिकीकरण (Krushi Yantrikikaran) म्हणजे जेथे शक्य असेल तेथे यांत्रिकीकरणाद्वारे शेतात कामे करुन घेण्याची प्रक्रीया. कृषी यांत्रिकीकरण (Krushi Yantrikikaran) योजनेंतर्गत यांत्रिकीकरणासाठी कर्ज व इतर सुविधा पुरविल्या जातात ज्यानुसार शेतकरी कमी किंमतीत जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात. कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 अंतर्गत ट्रॅक्टर, श्रेडर, उडणारी फॅन, औषध फवारणी पंप, डस्टर, सिंचन पंप इत्यादी सुविधा ग्रामीण बँकेमार्फत पुरविल्या जातात. यांत्रिकीरणामध्ये शेतकऱ्यांना 80 टक्के पर्यंत अनुदान हे दिले जाते. जेणेकरुन शेतकरी ही साधने घेऊन शेतीचा विकास करु शकणार आहे.
या उपकरणाला एवढे अनुदान –
1) पंपसेट (7.5 H.P पर्यंतच्या पंपसेटला त्याच्या किमतीच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10000 हजापपर्यंत अनुदान मिळते.
2) 40 H.P पर्यंतच्या ट्रॅक्टरला त्याच्या मूळ किमतीच्या निर्धारित किमतीच्या 20% अथवा जास्तीत जास्त 45000 रुपये एवढे अनुदान प्रस्तावित आहे.
3) 8 H.P पॉवर टीलरला त्याच्या किमतीच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 45000 हजार रुपयेपर्यंतचे अनुदान हे मिळते.
4) उस तोडणी यंत्राली त्याच्या किमतीच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 20000 हजार रुपये अनुदान मिळते.
5) 8 H.P किंवा त्यापेक्षा अधिकच्या पॉवर टीलरला त्याच्या किंमतीच्या 40% अथवा जास्तीत जास्त 45000 रुपये.
6) पॉवर थ्रेशरला मुळ किमतीच्या 40 टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त 20000 हजार रुपये मिळतात.
7) ट्रॅक्टर फवारणी यंत्राकरिता 25 टक्के निधी अनुदान स्वरुपात किंवा 4000 हजार रुपये हे देऊ केले जातात.
8) ट्रक्टरसाठी रोटावेटर हा महत्वाचा घटक आहे. रोटावेटरच्या निर्धारित किमतीच्या 50 टक्के किंवा 30000 हजार रुपये देऊ केले जातात.
वाचा –
कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 चा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) शेतकर्याचे आधारकार्ड.
2) बँकेचे पासबूक.
3) 7/12 आणि 8 अ.
4) जे यंत्र खरेदी केले आहे त्याचे original बिल.
5) जर ट्रॅक्टर शेतकर्याचे नावावर असेल तरच त्यावर अनुदान मिळेल.
अटी व नियम
शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
शेतकर्यांच्या नावावर जमीन असावी.
अर्जदार जर अनुसूचीत जाती किंवा जमाती या विभागात मोडत असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल. कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 ऑनलाइन अर्ज
तुम्हाला जर Krushi Yantrikikaran Yojana 2021 चा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर कृषी विभागाचे मुखपृष्ठ उघडेल. मुखपृष्ठावरच तुम्हाला Online Application किंवा Link 2 असे पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकि कोणत्याही एका पर्यायवर क्लिक करावे लागेल.
नंतर पुढील पृष्ठावर तुमच्या समोर Krushi Yantrikikaran Yojana 2021 चा अर्ज उघडेल.
अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक भरावी लागेल. (चुकीची माहिती आढल्यास तुम्ही पात्र ठरणार नाही)
सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला Submit Button वर क्लिक करावे लागेल. अश्या प्रकारे तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज भरतांना तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुमच्या गावाकरिता निवडण्यात आलेल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून त्रुटी दूर करता येतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा