ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Non Creamy Layer | राज्य शासनाचा मोठा निर्णय! नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची नाही गरज; जाणून घ्या कोणत्या प्रवर्गासाठी?

Big decision of the state government! No need for proof of income in case of non-crimelayer certificate; Know for which category

Non Creamy Layer | ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नॉन क्रिमिलेयर आणि उत्पन्नाचा दाखला अशी दोन्हीही कागदपत्रे सादर करावे लागतात. मात्र, राज्य शासनाने आता यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र असेल तर उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही. राज्य शासनाने याबाबतची अधिसूचना (जीआर) काढण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य शासनाचा निर्णय
या निर्णयामुळे ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज मिळणे सोपे होणार आहे. तसेच, त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठीही या निर्णयाचा फायदा होणार आहे. ओबीसी प्रश्नाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राशासनाला याबाबत आदेश दिले. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लवकरच जीआर काढण्यात येणार आहे. या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे. त्यांनी या निर्णयामुळे ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे म्हटले आहे.

वाचा : Education Loan | विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार ‘इतक्या’ लाखांचे कर्ज

अजितदादांनी भुजबळांचा मुद्दा खोडून काढला
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये सरकारी नोकरीतील ओबीसींच्या आकडेवारीवरुन खडागंजी झाली. सरकारी नोकरीत ओबीसींना न्याय मिळत नसल्याची भूमिका यावेळी भुजबळांनी मांडली. मात्र, ऐन बैठकीत अजित पवारांनी आकडेवारी मागवल्यानं भुजबळांनी तात्पुरती माघार घेतली. या बैठकीत ओबीसी वर्गाला आरक्षणाचा लाभ देणाऱ्या विविध योजनांची माहिती घेण्यात आली. तसेच, या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे कशी करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big decision of the state government! No need for proof of income in case of non-crimelayer certificate; Know for which category

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button