Glyphosate Banned | या तणनाशकाचा करता येणार नाही वापर; शेतकरी झाले नाराज.. काय आहे नेमकं कारण?
Glyphosate Banned: ग्लायफोसेटचा वापर आता यापुढं शेतकऱ्यांना करता येणार नाही. ग्लायफोसेट या तणनाशकावर बंदी (Ban) घालण्यात आलीय. गेली अनेक वर्षांपासून ग्लायफोसेटचा वापर केला जात होता. सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून यावर बंदी आणण्याचं ठरवलं होत. परंतु यंदा त्यावर बंदी आणली गेली. 2020 मध्ये तणनाशकावर बंदी घातली होती. केंद्र सरकारने ग्लायफोसेटच्या घटकाकडून बंधने घालण्यासाठी सूचना मागवल्या होत्या. तेलंगणा आणि केरळने यापूर्वीच ग्लायफोसेटवर बंदी घातली होती.
नुकतेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Agriculture Department) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की; कुणालाही ग्लायफोसेटचा वापर करता येणार नाही. व्यावसायिक कीटक नियंत्रक शिवाय कुणालाही तणनाशकाचा वापर करता येणार नाही. ग्लायफोसेटसाठी देण्यात आलेले नोंदणी प्रमाण नोंदणी समितीकडे परत करायला सांगितले.
वाचा: तुमचं आधार-पॅन कार्डला लिंक आहे ना? ‘या’ तारखेपर्यंत करा लिंक अन्यथा होईल मोठं नुकसान
प्रमाणपत्रधारकांना आता प्रमाणपत्रावर मोठ्या अक्षरात व्यावसायिक कीटक नियंत्रकामार्फत ग्लायफोसेट फॉर्म्युलेशनच्या वापरास परवानगी आहे, असा संदेश लिहून देण्यात येणार आहे. व्यावसायिक (Business) कीटक नियंत्रकाकडून तणनाशकाचा वापर करता येणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली जातेय.
शेतकऱ्यांचा वाढणार खर्च:
Increase in Expanse| तणनाशकाने जमीन आणि आरोग्याबाबत दुष्परिणाम होतात. मनुष्यबळ देखील कमी लागते. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील कमी होतो.
ग्लायफोसेटवर का येतेय बंदी:
2018 मध्ये अमेरिकेत ग्लायफोसेटवर बंदी घातली. यावेळी मोन्सॅन्टोया कंपनीनं त्या शेतकऱ्याला 289 दशलक्ष अमेरिकी डॉलर द्यावेत असा न्यायालयीन आदेश होता. शेतकऱ्याचा दावा घेत कॅलिफोर्नियात हा निकाल दिला. ड्वेन जॉन्सन हे 46 वर्षांचे असताना कीड नियंत्रक म्हणून काम करत होते. 30 वेळा तणनाशकाचा राऊंडअप केल्यानं कॅन्सर झाल्याचं सांगितलं गेलं. या कारणामुळे हे तणनाशक बंद केल्याचे समजते.
यूनायटेड स्टेट्स एन्व्हार्यनमेंट प्रोटेक्शन एजन्सीने सप्टेंबर 2017 मध्ये ग्लायफोसेटमुळे कर्करोग होत नसल्याचा अहवाल दिला होता. परंतु ग्लायफोसेट कर्करोग होण्यास कारणीभूत असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही 2015 मध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकणाऱ्या घटकांच्या यादीमध्ये ग्लायफोसेटचा समावेश केलेला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: