गडकरींची मोठी घोषणा! केवळ 10 रुपयांत शक्य होणार कारने प्रवास अन् वाहनाची किंमत असेल फक्त…
Nitin Gadkari | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सामान्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. नितीन गडकरी म्हणाले की, येत्या एक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत (Electric Vehicle Price) पेट्रोल कारच्या किमतीएवढी असेल. ही बातमी कार आणि दुचाकीस्वारांना दिलासा देणारी आहे. तुम्हीही कार (Electric Vehicle) किंवा बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर सरकारचे नियोजन लक्षात घेऊन तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. ज्यामुळे तुम्ही तुमचा आर्थिक (Financial) खर्च वाचवू शकता.
वाचा: अर्रर्र..! महाडीबीटी पोर्टलमुळे तब्बल 50 लाख शेतकऱ्यांना फटका; कोट्यवधींच्या अनुदानाला लागणार चुना
नितीन गडकरी म्हणाले की, “आज तुम्ही पेट्रोलवर 100 रुपये खर्च करत असाल तर इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचा खर्च (Insurance) 10 रुपयांपर्यंत खाली येईल,” असेही केंद्रीय मंत्री म्हणाले. एका अंदाजानुसार, ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या कारची किंमत प्रति किमी 1 रुपये पेक्षा कमी असेल. तर पेट्रोलवर चालणाऱ्या कारची (Agri News) किंमत 5 ते 7 रुपये प्रति किमीपर्यंत येते.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या
प्रदूषणाची पातळी होईल कमी
भविष्यात इलेक्ट्रिक (Electric Vehicles) इंधन प्रत्यक्षात येईल असे केंद्रीय मंत्री म्हणाले होते की, तंत्रज्ञान आणि हरित इंधनातील प्रगतीमुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्सच्या किंमती कमी होतील. येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीची असेल. असे गडकरी यांनी लोकसभेत सांगितले होते. कार्यक्षम स्वदेशी इंधनाकडे वळण्याच्या गरजेवर भर देताना ते म्हणाले की, आगामी काळात इलेक्ट्रिक इंधन प्रत्यक्षात येईल. त्यावर अवलंबित्व वाढल्यास प्रदूषणाची पातळी कमी होईल.
याशिवाय त्यांनी सहकारी खासदारांना हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांनी खासदारांना आपापल्या भागातील सांडपाण्याच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले. हायड्रोजन हा लवकरच सर्वात स्वस्त इंधनाचा पर्याय असेल, असा दावाही त्यांनी केला. गडकरी म्हणाले होते, ‘लिथियम आयन बॅटरीच्या किंमती झपाट्याने कमी होत आहेत. झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरी तयार केल्या जात आहेत.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- सरकारी पेन्शनर्सना नो टेन्शन; हयात असल्याचा पुरावा आता द्या घरी बसून…
- चर्चा तर होणारचं ना राव! चक्क 1 कोटींच्या बंगल्यात राहते ‘ही’ गाय अन् खाते तुपातले लाडू, जाणून घ्या खासियत
Web Title: Nitin Gadkari’s big announcement! Travel by car will be only 10 rupees and vehicle prices will also be cheaper; see how