Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा! टोल टॅक्सच्या नियमात बदल; प्रवाशांना होणार फायदा
Nitin Gadkari | महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेकदा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्स (Toll Tax Rules) भरावा लागतो. मात्र, केंद्र सरकार लवकरच टोल टॅक्सशी (Financial) संबंधित नियम बदलणार आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती दिली आहे. टोल टॅक्सशी (Toll Plaza) संबंधित विधेयक आणण्याची योजना आहे.
वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! बुडीत बँकेतील ग्राहकांना करणार ‘इतक्या’ कोटींचे वाटप, त्वरित करा अर्ज
काय म्हणाले गडकरी?
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, टोल टॅक्स (Agri News) न भरल्यास कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही. यासोबतच आगामी काळात टोल कर वसुलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले.
विधेयक आणण्याची तयारी सुरू
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, “आजपर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद (Insurance) नाही. मात्र, टोलबाबत विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे. आता थेट तुमच्या बँक (Bank) खात्यातून टोल टॅक्स कापला जाईल. त्यासाठी वेगळी कारवाई केली जाणार नाही.”
वाचा: शेतकऱ्यांनो गव्हाच्या ‘या’ जातीची करा लागवड; प्रतिक्विंटल मिळतोय 8 ते 9 हजारांचा भाव
थेट खात्यातून पैसे कापले जातील
नितीन गडकरींनी सांगितले की, आता टोल टॅक्स भरावा लागणार नाही, रक्कम (Finance) थेट तुमच्या खात्यातून कापली जाईल. याशिवाय, केंद्रीय मंत्री म्हणाले, ”2019 मध्ये आम्ही एक नियम केला होता की, कार कंपनीने फिट केलेल्या नंबर प्लेटसह येतील. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत आलेल्या वाहनांवर वेगवेगळ्या नंबरप्लेट आहेत. 2024 पूर्वी देशात 26 हरित द्रुतगती मार्ग तयार होतील आणि भारत रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेच्या बरोबरीने असेल.” यासोबतच आगामी काळात टोल कर वसुलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात येईल.
यावेळी काय नियम आहेत?
नितीन गडकरी म्हणाले की, “सध्या एखाद्या व्यक्तीने टोल रस्त्यावर 10 किमीचे अंतरही कापले तर त्याला 75 किमीचे शुल्क भरावे लागते. परंतु नवीन प्रणालीमध्ये फक्त अंतर कापण्यासाठी शुल्क आकारले जाईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आर्थिक संकटातून जात असल्याचे त्यांनी नाकारले.” ते म्हणाले की NHAI ची स्थिती पूर्णपणे ठीक आहे आणि त्यात पैशांची कमतरता नाही. ते म्हणाले की, यापूर्वी दोन बँकांनी कमी दराने कर्ज दिले होते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सोयाबीनला मिळतोय ‘इतका’ दर, जाणून घ्या आता विक्री करावी का नाही?
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’च शेतकऱ्यांना मिळणारं पीएम किसानचा 13वा हप्ता
Web Title: Nitin Gadkari’s big announcement! Changes in Toll Tax Rules; Passengers will benefit