योजना

ग्रामीण विकासासाठी नितीन गडकरी यांनी आखली ‘ही ‘ योजना …..

Nitin Gadkari came up with this scheme for rural development

कितीही शहरीकरण व खाजगीकरण झाले तरी भारतच नव्हे तर जगाला आधार देण्याचे काम शेती व ग्राम उद्योग करत आहेत हे कोणाच्या काळामध्ये सिद्ध झाले आहेत. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी असे म्हटले आहे की प्रत्येक गावामध्ये दोन ते तीन उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल.

लघु उद्योगाचे महत्त्व फार मोठे आहे त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना संधी देऊन रोजगार निर्मिती करण्याकडे त्यांचा भर आहे त्याकरता त्यांनी मंत्रालयात तशा सूचनाही जारी केले आहेत.देशामध्ये कोणता कोणता माल तयार केला जातो त्याची आयात कशी केली जाते याची माहिती घेऊन असे पदार्थ ग्रामीण भागात बनवण्याचा त्यांचा मानस आहे.

निर्यात वाढवून परकीय चलन,परकीय गुंतवणूक करण्याचे प्रयत्न देखील ते करत आहेत यासाठी ते अनेक उद्योजकांशी संपर्कात साधला आहेत. यातून ग्रामीण भाग सुबत्ता करणे हा उद्देश आहे त्यातून 11 कोटी रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत
MSME हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे श्री नितीन गडकरी म्हंटले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button