lang="en-US"> Weather Update | राज्यात पुढचे पाच दिवस उष्ण हवामान राहण्याची शक्यता ! जाणून घ्या सविस्तर अंदाज

Weather Update | राज्यात पुढचे पाच दिवस उष्ण हवामान राहण्याची शक्यता ! जाणून घ्या सविस्तर अंदाज

नाशिक : बंगाल उपसागरात येऊन गेलेल्या मोचा चक्रीवादळा ( Mocha Cyclone) मुळे वातावरणात कमालीचा बदल होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात (summer) उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ११ मे च्या दरम्यान नाशिकमध्ये तापमानाचा पारा ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर अचानक तापमानात घसरण सुरु झाली आहे. मागील ५ दिवसांमध्ये पारा ५.२ अंश सेल्सिअसने घसरल्याचे पहायला मिळत आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

Hot weather | पुढील पाच दिवस हवामान उष्णता

काल राज्याचे कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्रातर्फे पुढील पाच दिवस हवामान उष्ण राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवार (ता. १७) ते रविवारपर्यंत (ता. २१) असे हवामान असणार आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

वाऱ्याचा वेग तासाला १६ ते २१ किलोमीटर असणार

राज्यात पुढचे पाच दिवस अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. तसेच या दिवसांत तापमान कमाल ३७ ते ३९, तर किमान १९ ते २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता इगतपुरीच्या केंद्राने वर्तवली आहे. दरम्यान वाऱ्याचा वेग तासाला १६ ते २१ किलोमीटर राहण्याचा अंदाज सुद्धा यावेळी वर्तविण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील मागील काही दिवसांतील कमाल आणि किमान तापमान

१० मे- ४०.२-२३.७ अंश सेल्सिअस
११ मे-४०.७-२४.७ अंश सेल्सिअस
१२ मे-३९.७-२३.४ अंश सेल्सिअस
१३ मे-३८.६-२४ अंश सेल्सिअस
१४ मे-३६.३-२३.७ अंश सेल्सिअस
१५ मे-३६.१-२४.१ अंश सेल्सिअस

Next five days weather update

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Exit mobile version