ताज्या बातम्या

न्यूज हेडलाइन्स: सुपर फास्ट टॉप १०.. ऐका व वाचा एका क्लिक वर…

News Headlines: Super Fast Top 10 .. Listen and Read with One Click

१)बॅंक नोट प्रेस, देवास या ठिकाणी वेलफेयर ऑफिसर, सुपरवायजर, ज्युनिअर ऑफिस असिस्टंट आणि ज्युनिअर टेक्निशियन या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार बॅंक नोट प्रेसच्या अधिकृत वेबसाइट bnpdewas.spmcil.com वर भेट देऊ शकतात.

कृषी संबंधित बियाणे, खते, कीटकनाशके कृषी साहित्यांचा अडथळा दूर करणे बाबत आला सरकारचा नवीन जीआर…इथे क्लिक करा 👇


२)भारतीय हवामान खात्यानं 11 मे ते 13 मे या काळात देशाच्या पश्चिम हिमालय क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

३)पारंपारिक शेतीला पुन्हा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर सोन्याहून पिवळे असेच म्हणावे लागेल. सोलापुरातील माढा तालुक्यातील निमगाव गावच्या युवा शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादित केलेला केशर आंबा थेट युरोपला पाठवला आहे

४)जगभरात उसळलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेत या विषाणूचे रौद्र आणि भंयकर रुप समोर आल्यानंतर आता कोरोनाचे विषाणू हवेत 6 फुटापर्यंत आणि त्याहून अधिकच्या परिसरात पसरतात.

५)लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा, त्यात वयोवृद्धांचे होणारे हाल, सामाजिक अंतर पाळले न जाणे, लसीचा तुटवडा असले चित्र लक्षात घेऊन नगर तालुक्यात गाव तेथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि कमाई वाढवण्यासाठी आली नवीन प्रकारची शेती पहा, काय नवीन आहे या शेतीमध्ये वाचा सविस्तर बातमी…

6)गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी केंद्र सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नियामानुसार तीन पदरी वैद्यकीय मास्क आठ तासांनी बदलण्याची सूचना करण्यात आली आहेत.

७)आज सोन्या-चांदीच्या भावात कोणतीही वाढ झाली नाही. मुंबई आणि पुण्यामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,920 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 45,920 रुपये इतका आहे.

८)करोनातून बरे झालेल्या रुग्णांना सध्या ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस / काळी बुरशी) होऊन त्यांचा जीव धोक्यात येण्याच्या प्रकरणात वाढ होत आहे.

९)महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसानं खूप मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी वादळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे तर काही ठिकाणी वीज कोसळून जीवितहानी देखील झाली आहे.

शेतामध्ये करा “या” यंत्राचा वापर..

१०) आईटी क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी कॉग्निझंट नं भारतात 2021 या वर्षात 28,000 फ्रेशर्सना नोकरीची संधी देण्याचा निर्णय़ घेतला आहे.

झटपट पटापट थोडासा विरंगुळा: वाचा बहारदार विनोद…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button