ताज्या बातम्या

न्यूज हेडलाइन्स : ठळक घडामोडीचा आढावा…

News Headlines: Review of Highlights

1) तोक्ते वादळाचा (Cyclone Tauktae) सामना करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरु झाली आहे. अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

2)कोरोनाच्या काळात केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे वाढवलेले खतांचे दर केंद्र सरकारने कमी करावेत अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत (In the price of chemical fertilizers) 700 ते 800 रुपयांची वाढ केली आहे.

3)राज्यात उद्या आणि परवा लसीकरण होणार नाही. कोविन अॅप अपडेशनसाठी बंद (Covin closed for app updates) राहणार असल्याने लसीकरण होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

4)सध्या देशभरात खाद्यतेलाचे भाव (Edible oil prices) गगनाला भिडले आहेत. अशावेळी ‘जमिनी विकून जेमिनी खायची वेळ आलीय’ यासारखे डायलॉग आणि मिम्स वेगाने व्हायरल होत आहेत.

5)यंदा प्रथमच सोयाबीनचे भाव थेट 8 हजार (Soybean price directly 8 thousand) रुपये प्रतिक्विंटल झाला आहे, सोयाबीन बियाण्यांची कमतरता असताना आता इतर राज्यांनी सोयाबीन बियाणे परराज्यात पाठवायला बंदी घातल्याने महाराष्ट्रातील बियाणे संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

6) कोरोना महामारीचं (Corona epidemic) दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल, असा इशारा WHO ने दिला आहे.

7)देशासह राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी (Prediction of capital)यंदा राज्यात साधारण पाऊस पडेल. शेतीचे पीकही साधारण राहील. देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील, अशी भविष्यवाणी यावेळी वर्तविण्यात आलीय.

8)सोन्या-चांदीची (Gold) दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नसल्याने फक्त मुंबईतील सोने बाजाराचे जवळपास 800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला.

9)नैॡत्य मोसमी (Southwest monsoon)पाऊस यंदा ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :
1)यंदा मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता, वाचा व ऐका आजचा हवामान अंदाज…
2)जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित दर…
3)जनावरांचे पोषण, दुग्धवाढीसाठी वरदान ठरलेला मुरघास! पहा मुरघास बनवण्याची पद्धत…
4)शेती नेहमी तोट्यात का जाते? त्या, करता कोणत्या उपाययोजना हव्यात!
5)तिसरा लाटेचा लहान मुलांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता; अशी “घ्या” लहान मुलांची काळजी…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button