ताज्या बातम्या

New Traffic Rule | ब्रेकिंग न्युज: उद्यापासून ‘हा’ वाहतूक नियम पाळा नाहीतर, द्यावा लागेल मोठा दंड..!

वाहतुकीशी निगडित महत्त्वाचे नियम –

आपल्याला वाहतुकीशी निगडित नियम ( Traffic Rules ) पाळणे गरजेचे आहे. अनेकदा घाई गडबडीत वाहन चालवताना, एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचायचं ( Lifestyle) असतं तेव्हा वाहन चालकांकडून चुका होतात. या चुका कधी लहान तर कधी मोठ्या देखील असतात. जसे की कार चालवताना चालक किंवा त्याच्या शेजारी बसलेला प्रवासी सीट बेल्ट ( Seat belt ) लावायला विसरतो. दुचाकी चालवताना हेल्मेट ( Helmet) घालायला विसरतो, वाहनाची लाईट किंवा हॉर्न सदोष असली तरी तो चालकाचा किंवा ड्रायव्हिंगचा दोष मानला जातो. आपल्या देशात वाहतुकीशी संबंधित वेगवेगळे नियम (Traffic Rules) आहेत आणि हे नियम मोडल्यास नागरिकांना दंडही भरावा लागतो. पण तरीही भारतातील लोक या नियमांच्या बाबतीत उदासीन आहेत.दुचाकीवर हेल्मेट (helmet) वापरावे, गाडी चालवताना लायसन्स( License) आपल्याबरोबर बाळगावे, फोनवर बोलू नये, सीट बेल्ट लावावे, हे काही साधारण नियम आहेत.

वाचा: अरे वाह! केवळ 500 रुपये गुंतवून लखपती होण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या काय आहे प्लॅन…

काय आहे हा नवीन नियम –

चारचाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक (Seatbelt Compulsion) करण्यात आला आहे. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नाही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवता यावा यासाठी पोलिसांनी दिलेली 15 दिवसांची मुदत आज सोमवारी संपत आहे. त्यामुळे सहप्रवाशाला केलेल्या हेल्मेटसक्तीप्रमाणे ( Helmet Compulsion) ही सक्तीदेखील बाळगळण्याची शक्यता आहे.

टाटा टियागो कंपनीची NRG व्हेरिअंट लाँच; या कारची आहे एवढी किंमत; जाणून घ्या फीचर्स

सर्वत्र कडक अमलबजावणी –

नवीन नियमांचे पालन न केल्यास दंड भरने बंधनकारक ( Mandatory) राहील. देशभरातील अनेक राज्यांमध्ये रहदारीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून नवी दिल्लीत चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असाच नियम मुंबईतदेखील लागू करण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी 14 ऑक्टोबरला जाहीर केले की, मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) (सीट बेल्ट न लावणे) अंतर्गत चारचाकी मोटार वाहनातील वाहनचालक व इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास दंडास पात्र असल्याची तरतूद आहे.1 नोव्हेंबरपासून सहप्रवासी विनासीटबेल्ट आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक करावी केली जाईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले होते.

वाचा: घरावर लावा ‘ही’ मशीन अन् मोफत मिळवा वीज! मोठ्या उद्योजकानही केलं कौतुक; जाणून घ्या सविस्तर…

मंगळवारपासून दंडात्मक कारवाई –

वाहतूक पोलिसांनी दिलेली मुदत 31 ऑक्टोबरला संपत असल्याने मंगळवारपासून रस्त्यावरील वाहनांमध्ये सहप्रवाशाने सीटबेल्ट लावला नसेल तर इ चलान कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. ओला, उबर (ola , uber ) यांसारख्या ॲपवरील टॅक्सीचालकांनी पोलिसांच्या या सक्तीला विरोध केला नसला तरी काळी-पिवळी टॅक्सीमध्ये हे बेल्ट बसविण्यात अडचणी आहेत. त्यामुळे ही सक्ती आम्हाला नसल्याचे टॅक्सीचालक (taxi) म्हणत असले तरी कारवाई सरसकट सर्वांवर केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button