कृषी सल्ला

अरे वाह! मक्याच्या नव्या दोन वाणांची निर्मिती; भरघोस उत्पादनासाठी आहे फायदेशीर

मक्याची लागवड –

मका ( Maize ) आहे रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक आहे . संपूर्ण भारतात याचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गहू ( Wheat ) आणि तांदळानंतर ( Rice ) या पिकाचे तिसऱ्या स्थान वरती ठेवले जाते . मका एक नगदी पीक ( Cash Crop ) म्हणून सुद्धा ओळखला जातो .पोल्ट्री क्षेत्रात (Poultry Sector) मक्याला जागतिक बाजारपेठेत मोठया प्रमाणात मागणी आहे. मक्याचा चारा ( Maize fodder ) सुद्धा उपयोगी ठरतो . स्वीट कॉर्न, (Sweet Corn) बेबी कॉर्न (Baby Corn) मक्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे. यामुळे या पिकाला भरपूर महत्व आहे व याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते .

वाचा: बिग ब्रेकिंग! कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ‘इतक्या’ कोटींच्या निधीस मान्यता; निम्याचं किमतीत मिळणारं ट्रॅक्टर

सुधारित वाणांची गरज –

मक्याच्या सुधारित वाहनांची भरपूर आवश्यकता आहे कारण गेल्या काही दशकांमध्ये मक्याचे लागवड क्षेत्र वाढलेले आहे . मक्याचे क्षेत्र ६ दशलक्ष हेक्टरवरून १० दशलक्ष हेक्टरपर्यंत वाढले आहे. मका उत्पादनातही १२ दशलक्ष टनांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कमी खर्चात आणि कमी वेळेत चांगले उत्पादन घेण्यासाठी मक्याच्या सुधारित वाण निर्मिती वरती भर देणे आवश्यक आहे. कमी खर्चामध्ये सर्वात जास्त उत्पादन मिळवण्याची आज गरज आहे .

नवीन वाणांची निर्मिती –

कृषी विज्ञान केंद्र, बंगलोर ( KVK Bengaluru) येथील शास्त्रज्ञांनी मक्याचे एमएएच १४-१३८ ( MAH 14-138) आणि एमएएच १५-८४ ( MAH 15-84) हे दोन वाण ( Varieties) विकसीत केले आहेत. या वाणांपासून मक्याचे चांगले उत्पादन मिळते याशिवाय मका कणसांच्या काढणीनंतरही मक्याचा चारा हिरवा राहतो हे या वाणांचे खास वैशिष्ट आहे. त्यामुळे जनावरांना अधिक काळापर्यंत हिरवा चारा शेतातच उपलब्ध होतो. चारा हिरवा राहिल्यामुळे तो जनावरांना सहजपने पचतो.

वाचा: आता शेतकऱ्यांना विहिरींसाठी मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान; जाचक अटही रद्द

वाणांची वैशिष्ट्ये अशाप्रकारे आहेत –

  • एमएएच १४-१३८ हे वाण विकसीत करण्यासाठी सुमारे ८ वर्षाचा कालावधी लागला. या वाणाला व्यावसायिक शेतीसाठीही मान्यता देण्यात आली आहे.
  • एमएएच १४-१३८ वाणाचा कालावधी १२० ते १३५ दिवसांचा असून, एकरी ३५ ते ३८ क्विंटल उत्पादन घेता येते.
  • एमएएच १५-८४ या वाणाचा कालावधी ११५ ते १२० दिवसांचा आहे. हे वाण अद्याप व्यापारी तत्वावर लागवडीसाठी मंजूर झालेले नाही.
  • कणसांच्या काढणीनंतरही मक्याचा चारा हिरवा राहतो

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button