ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
राशिभविष्य

Astrology | ‘या’ तीन गोष्टी कधीच हातातून पडू देऊ नका, अन्यथा होईल मोठे नुकसान

अनेकवेळा स्वयंपाक करताना अनेक गोष्टी हातातून पडत असतात. पण तुम्हाला माहिती आहे? स्वयंपाक घरातील (Kitchen)अशा काही गोष्टी आहेत, त्या हातातून पडता कामा नये.

Astrology | या गोष्टी हातातून पडल्या तर कर्ज (Loan) वाढण्याची लक्षणे असतात असे बोलले जाते. घाईघाईत काम करताना काही वेळा हातातून वस्तूही (Object) पडतात. पण अति घाई संकटात नेई म्हणतात ते अगदी खरे. काही गोष्टी हातातून पडणे, सांडणे अत्यंत अशुभ (Ominous) मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) तीन वस्तू कोणत्या आहेत ते पाहूया…

मीठ सांडणे
मीठ (Salt) सांडणे हे अशुभ मानले जाते. मीठ हा रोज जीवनात वापरला जाणारा अन्नपदार्थ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मीठाचा संबंध शुक्र आणि चंद्राशी आहे. जर त्या दिवशी तुमच्या हातातून मीठ पडले तर ते पत्रिकेत चंद्र आणि शुक्राची कमजोर स्थिती दर्शवते. शुक्र ग्रहाच्या कमकुवत स्थितीमुळे विवाहित लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होतात असे म्हंटले जाते. तसेच जेव्हा चंद्र कमजोर असतो तेव्हा व्यक्तीला श्वसनाचे आजार होण्याची शक्यता असते असे बोलले जाते.

वाचा: Astrology | घरात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी लावा ‘ही’ झाडे, जाणून घ्या कोणती आहेत ही झाडे

हातातून तेल सांडणे
हातातून तेल (Oil) सांडणे हे संकटाचे लक्षण मानले जाते. अनेक वेळा स्वयंपाक करताना घाईघाईने हातातून तेल पडते. ज्योतिषशास्त्रानुसार, तेल पडणे हे घरामध्ये संकट येण्याचे संकेत आहे. इतकंच नाही तर ज्योतिषशास्त्रात तेल कमी होण्याचा संबंध व्यक्तीवरील कर्ज वाढण्याशीही जोडला जातो, असे म्हंटले जाते.

वाचाAstrology | तुम्हीही नोकरीच्या शोधात आहात, नोकरी मिळत नाहीये? तर ‘या’ रत्नाची घाला अंघटी, लगेच मिळेल गुडन्यूज

दूध उतू जाणे
दुध (Milk) उतू जाणे हे सुद्धा अशुभ मानले जाते. असे बर्याचदा होते गॅसवर दूध तापवायला ठेवलंय हे तुम्ही विसरता, किंवा दुधाचं पातेलं घाईघाईत हातातून निसटते. असे दुध सांडणे ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानले जाते, कारण दुधाचा संबंध चंद्र ग्रहाशी आहे. हातातून दूध सतत सांडले तर घरात पैशाची समस्या निर्माण होते असे बोलले जाते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button