राष्ट्रवादी काँग्रेसचा भारत बंदला पाठिंबा! संयुक्त किसान मोर्चाने 26 मार्च रोजी भारत बंदची दिली हाक…
NCP supports Bharat Bandla! Samyukta Kisan Morcha calls for India Bandh on March 26
गेल्या काही दिवसापासून कृषी कायदे विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. 100 दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत. किती दिवस वाट पाहायला लावणारा हे सरकार? आत्तापर्यंत 300 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. अजून किती शेतकरी गमावणार आपला जीव? कधी येणार सरकारला जाग? याशिवाय गॅस सिलेंडर च्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे खिशाला झळ बसली आहे. पेट्रोल,डिझेलची वाढ गगनाला भिडली आहे. शेतीमधील औषधे, खते यांच्या 200 ते 250 रुपये दरातही वाढ झाली आहे. शेतीची मशागत करणे देखील शेतकऱ्याला अवघड होऊ लागले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने कोणाकडे मागायचा न्याय? कोणाकडे मागायचा मदतीचा हात ? हे सारे प्रश्न निरुत्तरीत आहेत. शेतकरी जगला तर जग तरेल. कोरोनाच्या कठीण काळात देखील सर्व कामं ठप्प झाले होते. मात्र शेतकरी शेतामध्ये प्रामाणिकपणे रबत होता. तरीही सरकार शेतकऱ्यांना दुर्लक्षित करत आहे.
त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाने 26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.