कोवीड - १९

” या” वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारकडून मोफत लसीकरण नवाब मलिक यांची माहिती

Nawab Malik's information on free vaccination from the state government to citizens in this age group

केंद्र सरकारने एक मेपासून देशभरात अठरा वर्षाच्या पुढील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील आपले नियोजन जाहीर केलेले दिसते.

महाराष्ट्र राज्य सरकारने आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 18 ते 45 वयोगटातील प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.यासाठी राज्य सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली. यासाठी जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कॅबिनेटमध्ये लसीकरणाच्या दराबाबत चर्चा झाली असता सर्वांचे एकमत होऊन राज्यातील जनतेला मोफत लस पुरवण्याचा निर्णय झाला होता. याकरता लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हटले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील लसीकरण आणि ऑक्सिजन सह इतर वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा विषयी काल शनिवारी माहिती दिली.
एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त मोफत लसीकरण चे गिफ्ट मिळणार असल्याचे संकेत देखील यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

ऑक्सीजन बाबतही जे बंद पडलेले प्लांट आहे ते लवकर सुरू करण्यात येणार आहेत काही विजया भावी ते बंद होते काही फिनेशियल प्रॉब्लेम मुळे बंद होते,आता ते लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे ऑक्सिजनची निर्मिती सुरू करण्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button