कृषी सल्ला

ब्रेकिंग! कृषी विद्यापीठाच्या ‘या’ सात नव्या वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता, शेतकऱ्यांच्या उत्पादनात होणार वाढ

Agriculture | आता पुन्हा शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस चालना मिळणार आहेत. कारण आता राहुरी कृषी विद्यापीठाच्या (Rahuri Agricultural University) नव्या सहा वाणांना मान्यता मिळाली आहे. यामुळे आता थेट शेतकऱ्यांच्या (Agriculture) उत्पन्नात वाढ होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या (Financial) सक्षम होण्यासाठी एक नवी संधी मिळणारं आहे. चला तर मग कोणत्या नव्या सात वाणांना मान्यता मिळाली आहे हे जाणून घेऊयात.

वाचा: आनंदाची बातमी! पुढील महिन्यात कापसाचे दर वाढणार; जाणून घ्या चालू महिन्यात कसा राहील बाजारभाव?

नव्या सात वाणांना मान्यता
आता महात्मा फुले राहुरी कृषी (Agriculture Department) विद्यापीठमधील नव्या सात वाणांना मान्यता मिळाली आहे. ऊस, गहू, ज्वारी, तीळ, उडीद, तूर या वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीमध्ये राज्य स्तरावर मान्यता देण्यात आली आहे.

कोणती आहेत नवी सहा वाण?
तर आता ऊसाचा फुले 11082 (कोएम 1108 ) गव्हाचा फुले अनुपम, रब्बी ज्वारीचा फुले यशोमती, तूरीचे फुले तृप्ती आणि फुले कावेरी, तीळ पिकाचा फुले पुर्णा व उडदाचा फुले वसु या नव्या सहा वाणांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे थेट शेतकऱ्यांच्या (Farming) उत्पादनात वाढ होणार आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादनात होणार वाढ
ऊस फुले 11082
नुकत्याच ऊस फुले 11082 य मान्यता मिळालेल्या वाणामुळे ऊसाचे जास्त उत्पादन निघणार आहे. या वाणाचे ऊस उत्पादनात (Sugarcane Production) 15.40 टक्के , साखर उत्पादन 13.52 टक्के आहे. जे इतर वाणांपेक्षा सरस आहे. तसेच फुले अनुपम ( एन.आय. ए.डब्ल्यु. 3624 ) गव्हात प्रथिनांचे प्रमाण 11.4 टक्के आहे. तसेच तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे.

ज्वारी
रब्बी ज्वारीचा फुले यशोमती (आर.एस. व्ही. 1910) या वाणाचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 9.3 क्विंटल असून उच्च उत्पादनक्षमता प्रति हेक्टरी 12.00 क्विंटल इतकी आहे. त्याचबरोबर तूरीचा फुले तृप्ती या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी 22.66 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल.

वाचा:

तीळ
तूरीचा फुले तृप्ती (पी.टी.10-1) या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी 22.66 क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची उच्च उत्पादनक्षमता प्रति हेक्टरी 32.00 इतकी आहे. तिळाचा जे.एल.टी. 408-2 ( फुले पूर्णा ) या वाणाचे उत्पादन 705 किलो प्रति हेक्टर आहे. ज्यात तेलाचे प्रमाण 49 टक्के इतके आहे.

तूर
तुरीचा दुसरा वाण फुले कावेरी (पी.टी) या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी 15.9 1 क्विंटल उत्पादन मिळते.

उडीद
उडदाचा पियु 0609-43 (फुले वसु) या वाणाची अधिकतम उत्पादनक्षमता 19 क्विंटल आहे. ज्याचा टपोरा दाणा असून 100 दाण्याचे वजन 4.87 ग्रॅम आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! National level recognition of seven new varieties of the University of Agriculture, the production of farmers will increase

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button