Worm| नाशिक: कळवणमध्ये अमेरिकन लष्करी अळीवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण, एकात्मिक नियंत्रण पद्धतींचा सल्ला
Worm| नाशिक, २१ जुलै २०२४: कळवण तालुक्यातील पिळकोस येथे कृषी विभाग, कळवण आणि कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमात मका उत्पादक शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करण्यात आले.
गोळखाल, गोपालखडी, हिंगवे, मोहभणगी आणि पिळकोस या गावांमध्ये आयोजित या जनजागृती कार्यक्रमात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
यंदा खरीप हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव (Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव येथील पीक संरक्षण तज्ज्ञ विशाल चौधरी आणि रुपेश खेडकर यांनी शेतकऱ्यांना लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी योग्य तंत्रज्ञान आणि माहिती दिली.
कार्यक्रमात उपस्थित असलेले कळवणचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे, तालुका कृषी अधिकारी मीनल म्हस्के, मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल रंधे, कृषी पर्यवेक्षक कांतीलाल पवार आणि कृषी सहायक प्रताप मोगरे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
वाचा: No answers| शेतकऱ्यांना ५ हजार रुपये अनुदान: अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं नाही|
विशाल चौधरी, कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव (तज्ञ) यांनी सांगितले की,
- खरीप हंगामात लाल कांदा आणि मका या पिकांमध्ये व्हाइट ग्रब आणि हुमनी (कागळे) या किडींचा प्रादुर्भाव होत आहे.
- या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी शेणखत (manure) पूर्णपणे कुजून गेल्यावरच त्याचा वापर करावा. कच्चे शेणखत टाळावे.
- योग्य शेणखत व्यवस्थापनाने हुमनी अळीचा प्रादुर्भाव कमी करता येतो.
मंडळ कृषी अधिकारी, कळवण, विठ्ठल रंधे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की,
- मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास घाबरून न जाता वेळीच योग्य ती कीटकनाशके वापरावीत.
- तसेच, ३० ते ४० दिवसांपर्यंत मका पिकाची योग्य काळजी घेऊन लष्करी अळीचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रित करता येतो.
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि जागरूकता (Awareness) 0000000000000000निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी या किडीपासून आपले पीक वाचवू शकतील आणि चांगल्या उत्पादनाचा लाभ घेऊ शकतील.