Pomegranate boom डाळिंब बाजारात चांगली तेजी
Pomegranate boom नाशिक: सध्याच्या डाळिंब हंगामात बाजारपेठेत चांगली तेजी दिसून येत आहे. विशेषतः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाचे दर तीनशे रुपये किलोपर्यंत पोहोचले (reached) आहेत.
दरम्यान, आज ७ सप्टेंबर रोजी पुणे मोशी बाजार समितीत डाळिंबाची ९ क्विंटलची आवक झाली असून, मालाला सरासरी १० हजार रुपये दर मिळाला आहे.
विभिन्न बाजारपेठांमधील दर:
- मुंबई: मुंबई फ्रुट मार्केटमध्ये काल १२३९ क्विंटलची आवक होऊन सरासरी १२ हजार रुपये दर मिळाला.
- पिंपळगाव बसवंत: येथे क्विंटलला ११ हजार रुपये दर मिळाला.
- सोलापूर: सोलापूर बाजारात लोकल डाळिंबाला ८ हजार रुपये,
- सांगली: सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये ९ हजार ५०० रुपये,
- पुणे-मोशी: येथे ८ हजार ५०० रुपये दर मिळाला.
- नाशिक: नाशिकमार्केट यार्डमध्ये मृदुला डाळिंबाला ११ हजार रुपये दर मिळाला.
- आटपाडी: आटपाडी बाजारात भगवा डाळिंबाला क्विंटलमागे १३ हजार रुपये दर मिळाला.
नाशिकमध्ये आवक कमी:
नाशिक कृषी उत्पन्न फळ बाजार समितीत काही दिवसांपासून डाळिंबाच्या केवळ १५ ते २० वाहने माल येत असल्याने डाळिंबाचे दर वाढले (increased) आहेत.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान:
यावर्षी हंगामाच्या अगदी प्रारंभीपासूनच डाळिंबाचे दर तेजीत असल्याने डाळिंब उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून दैनंदिन संपूर्ण भारतभर बंगळुरू, नेपाळ, बांगलादेशमध्ये डाळिंब माल रवाना केला जातो.
कमी उत्पादनामागे कारणे:
काही वर्षांपासून डाळिंब फळ उत्पादन अनेक कारणांमुळे घटले असले तरी दुसरीकडे मात्र बाजारभावाची गोडी यंदा कायम असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी यंदाच्या वर्षी अत्यल्प समाधानी (Satisfied) आहेत.