‘या ‘दिवशी करण्यात येणार भारतमध्ये ” लसीकरण उत्सव” नरेंद्र मोदी नवीन घोषणा!
Narendra Modi announces 'Vaccination Festival' in India
देशभरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवीन घोषणा जाहीर केली आहे या घोषणेत असे म्हटले आहे की 11 एप्रिल ते 14 एप्रिल लसीकरण उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत(CM Meeting with PM) बैठक घेण्यात आली, त्यावेळी मोदी सरकारने ही घोषणा करण्यात केली.
कोरोनाच्या (Corona Vaccination) लसीकरणामुळे कोरोना टेस्ट कडे (Corona Testing) दुर्लक्ष केले जात असल्याकारणाने कोरोना बाधीत व्यक्तींच्या संख्येत वाढ होत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना काही सूचना देखील दिल्या त्यात त्यांनी बोलताना असे म्हटले की, कोरोना व्हायरससोबत लढायचे आहे हे लक्षात ठेवा यामुळे कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कोरोना चाचण्या वाढवायला हव्यात, असे मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.कोरोना टेस्टिंगची व्याप्ती 70 टक्के RT-PCR झाल्या पाहिजेत. असे पुढे त्यांनी नमूद केले.