शासन निर्णय

Ration Card | या जिल्ह्यात कागदी रेशन कार्ड कालबाह्य! आता ई-शिधापत्रिकाद्वारे घरबसल्या दुरुस्ती आणि नोंदणी

नांदेड: Ration Card | आतापासून नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना कागदी, केशरी आणि पांढऱ्या रेशन कार्डचा त्रास सहन करावा लागणार नाही. पुरवठा विभागाने ई-शिधापत्रिका सुविधा सुरू केली आहे ज्याद्वारे नागरिक घरबसल्या नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतात आणि जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती देखील करू शकतात.

९ हजार ८६ ई-शिधापत्रिका तयार

या योजनेचा शुभारंभ फेब्रुवारी २०२४ मध्ये झाला होता आणि त्यावेळापासून जिल्ह्यात ९ हजार ८६ ई-शिधापत्रिका (e-ration card) तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये अंत्योदय योजनेतील ४७ कुटुंबे आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील ९ हजार ८१४ नवीन लाभार्थींचा समावेश आहे.

वाचा:Sibyl Score|शेतकऱ्यांवर पुन्हा सिबील स्कोअरची वादळे! कर्जासाठी बँकांचा अडथळा?

ऑनलाइन नोंदणी

नागरिकांना सेतू किंवा पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून ई-शिधापत्रिका मिळवता येते. नोंदणीसाठी आधार क्रमांक आवश्यक आहे.

५ लाख ३१ हजार रेशन कार्डधारक

जिल्ह्यात एकूण ५ लाख ३१ हजार १०४ रेशन कार्डधारक आहेत. यापैकी २० लाख २१ हजार २९४ लाभार्थी ऑनलाइन झाले आहेत. आधार क्रमांक नसलेले आणि मृत्यू झालेल्या सदस्यांची माहिती अद्ययावत नसलेले लाभार्थी लवकरच या प्रक्रियेत समाविष्ट केले जातील.

ई-शिधापत्रिकेचे फायदे

  • घरबसल्या अर्ज आणि दुरुस्ती
  • कागदाचा वापर कमी होणे
  • प्रिंटिंग आणि वाहतूक खर्चात बचत
  • लाभार्थ्यांना तात्काळ रेशन कार्ड उपलब्ध
  • स्वस्त दरात अन्नधान्य खरेदी

अधिक माहितीसाठी

अधिक माहितीसाठी नागरिक पुरवठा विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button