कृषी बातम्या

Namo Shetkari Yojana | मोठी बातमी! गणेशोत्सवापूर्वी ‘नमो शेतकरी महासन्मान’चा पहिला हप्ता 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात होणारं जमा

Big news! Before Ganeshotsav, the first installment of 'Namo Shetkari Mahasanman' will be deposited in the accounts of 85 lakh 60 thousand farmers.

Namo Shetkari Yojana | महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये दिले जाणार आहेत. या रकमेचा पहिला हप्ता गणेशोत्सवापूर्वी जमा होणार आहे. कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा डेटा घेऊन राज्यातील प्रत्येक विभागांमधील 100 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून योजनेची (Namo Shetkari Yojana) पडताळणी केली आहे.

वाचा : Namo Shetkari | नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ अटी त्वरित पूर्ण करा ; अन्यथा होऊ शकते नुकसान !

The first installment will be deposited in the account पहिला हप्ता होणार खात्यात जमा
आता तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान‘ योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्यात सध्या दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेल्याने आता त्यांना पीकविमा संरक्षित रकमेतील 25 टक्के मिळणार आहे. त्यासाठी सरकारला विमा कंपन्यांना 1551 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

Namo Shetkar Maha Sanmanman Yojana नमो शेतकरी महासन्मान योजना
‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा 14वा हप्ता मिळाला पाहिजे. या योजनेसाठी सरकारला एक हजार 712 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, मालमत्तेची एकत्रित नोंद देखील केलेली नाही अशांची यादी प्रसिद्ध करून चावडी वाचनाद्वारे योजनेतून वगळले जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big news! Before Ganeshotsav, the first installment of ‘Namo Shetkari Mahasanman’ will be deposited in the accounts of 85 lakh 60 thousand farmers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button