पंतप्रधान पिकविमा योजनमध्ये नगरकरांचा सहभाग घटला…का नोंदवला गेला कमी प्रतिसाद?
Nagarkars' participation in PM crop insurance scheme decreases… Why was less response reported?
पिकांची नैसर्गिक दृष्ट्या हानी झाल्यास तसेच इतर कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास केंद्र सरकार द्वारे पंतप्रधान पिक विमा योजना मिळत असते.परंतु या योजनेमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नगरकरांनी या योजनेत सहभाग कमी नोंदवला आहे. यंदाच्या वर्षी वेगवेगळ्या कारणामुळे नगरकरांचे पिकांचे नुकसान झाले, तरही मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दीड लाखाहून कमी सहभाग नोंदवण्यात आला.
पिक विमा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी कृषी विभागाने विविध कार्यक्रम करण्याची गरज आहे. पिक विमा बद्दल जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे ही जबाबदारी देखील असते. मात्र कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये या वर्षी जनजागृती कार्यक्रम कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे यावर्षी नगरकरांनी पीक विमा योजनेमध्ये कमी प्रतिसाद दिला आहे
अवेळी पाऊस ,गारपीट, अति जास्त पाऊस, तसेच इतर नैसर्गिक संकट यामुळे शेत पिकाची हानी होते. त्यामुळे सरकारद्वारे पिक विमा योजना राबवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई ला थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न होतो. त्याकरिता कृषी विभाग वेगवेगळे कार्यक्रम देखील करत असतात.
नगर मध्ये असे कृषी विभागामार्फत कार्यक्रम होत नाहीत त्यामुळे कृषी अधिकारी व कृषी विभागावर तेथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.कोणती कोणती योजना प्रभावीपणे राबवली जात नाही असे देखील काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या योजने बद्दल काही शेतकऱ्यांना माहीत नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा
१) आश्चर्य! जगातील छोटी गाय भारतामध्ये काय विशेष आहे या गाईंमध्ये..
२) अनेक संकटावर मात करत या गावाने पटकावला अंजीर मध्ये नंबर वन होण्याचा मान.