ताज्या बातम्या

नगरकरांनी दिला मदतीचा हात! कोविड रुग्णांनासाठी जमवले इतके रोख रुपये, तसेच केला धान्यसाठा जमा…

Nagarkars give a helping hand! So much cash collected for Kovid patients, as well as grain stocks made

खरेच चांगले काम करताना जनता सुद्धा मदतीला धावून येते याचे उत्तम उदाहरण नगरकरांनी दाखवून दिले आहे. आमदार साहेबांनी जनतेला अवाहन करताच,सतरा लाख रोख रक्कम आणि पाच टन धान्य जमा झाले

याव्यतिरिक्त भाजीपाला, फळे, अंडी,किराणा वाफ घेण्याची यंत्रे, थर्मास,अशा अनेक वस्तू रुग्णांना वाटप करण्यात आले. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री निलेश लंके साहेब यांनी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांनी दुसऱ्यांदा कोविड सेंटर उभारले आहे. या सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार साहेब यांचे नाव देण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे 1100 बेडचे हे कोविड सेंटर आहे. यामध्ये 100 बेड हे ऑक्सिजन बेड म्हणून ठेवले आहेत.

प्रांत अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करत हा सोहळा पार पडला.
आमदार निलेश लंके म्हणाले माझ्या मतदारसंघातील भाळवणी येथे अकराशे बेडची सोय केलेली आहे, त्यातील 100 बेड हे ऑक्सिजन बेड असतील.

प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र पाण्याची बॉटल, नॅपकिन,साबण आदी सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. 24 तास पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे तिथे एक मोठी स्क्रीन लावलेली आहे, त्या स्क्रीनवर रोज योगाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.

आमदार लंके साहेब या ठिकाणी स्वतः लक्ष देऊन आढावा घेत आहेत. सर्व रुग्णांना औषध उपचार, जेवणाची सोय आणि काही अडचण असेल तर याबाबत आढावा घेत आहेत.
सर्व रुग्ण बांधवांना आधार देत कोणी घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button