ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

कोणत्याही बँकेची मदत न घेता 70 वर्षीय श्री खर्डे यांनी शेतजोड व्यवसायातुन कमावले वर्षाकाठी 8 ते 9 लाख उत्पन्न…

Mr. Kharde, 70, earns Rs. 8-9 lakhs per annum from farming business without any bank help

अंगी जिद्द असेल आणि मनामध्ये निश्चय असेल अथक परिश्रम करून यश मिळवता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दादाभाऊ खर्डे. टाकळी हाजी येथे राहणारे दादाभाऊ खर्डे ज्यांच्याकडे जिरायत शेती, पाण्याची कमतरता त्यामुळे उत्पन्नाची हमी नव्हती. परंतु खचून जायचे नाही, हार मानायची नाही असे त्यांनी ठरवले होते. आज दरे खोरे, डोंगर माथा, तुडवत काटेरी रस्त्या तुडवत चारा-पाण्याची व्यवस्था करत स्वतःचा मार्ग सुखकर केला .

नियोजनबद्ध शेती पूरक व्यवसाय केल्यास स्वतःची भरभराट साधता येते सुरवातीला त्यांनी एका शेळी पासून ते पन्नास शेळ्यांच्या शेळी पालनाचा व्यवसाय करून प्रगती केली. कान्हूर मेसाई येथील 70 वर्षीय गणोजी खर्डे व त्यांचा मुलगा दादाभाऊ खर्डे यांनी हा व्यवसाय केला आहे. गेल्या 32 वर्षांपासून शेळीपालनाचा शेती पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी निवड केलेली आहे.

यासाठी कोणतेही बँकेचे त्यांनी कर्ज घेतले नाही. दादाभाऊ खर्डे यांनी शेळी पालन करण्यासाठी त्यांनी तळेगाव दाभाडे येथील रुडसेट इन्स्टिट्यूटमध्ये शेळी पालनाचे प्रशिक्षण घेतले व पारंपरिक शेती फाटा देऊन त्यांनी वडिलांच्या या व्यवसायाकडे लक्ष दिले.

त्याकरता त्यांनी शिरोही तोतापुरी, सोजत, बीटल जातीचे बोकड आणली व गावरान जातीच्या शेळीवरच संकर करण्याचा प्रयोग केला. त्यातूनच त्यांना वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या उपलब्ध झाल्या. वडील व मुलगा दोघेही मिळून हा शेळी पालन व्यवसाय करतात त्यासाठी त्यांनी घराजवळच गोठा देखील तयार केला आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था ही केली आहे.

खर्डे यांचे मार्गदर्शन…
शेळीपालनासाठी तरुणांनाही मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. शेती पूरक व्यवसाय करताना तरुणांनी ज्येष्ठांचे मत विचारात घेऊन आधुनिक पद्धतीने शेतीपूरक व्यवसाय केल्यास यश मिळते असे खर्डे यांचे मत आहे. शेतीत कष्ट करूनही उत्पादन जरी मिळाले तरी बाजारभाव मिळतोच असे नाही. निसर्गापुढे पाहिजे तसे उत्पन्न व बाजार भाव मिळत नाही. त्यामुळे शेतीला जोड व्यवसाय देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button