
Mouth odor: तोंडाचा वास कशामुळे येतो? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. हा तोंडाचा वास जर तोंडाची अस्वच्छता केल्यानं येतो. व्यवस्थित दात न घासणे हलगर्जीपणा करणे यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. यामुळे बरीच लोक दूर राहणे पसंत करतात. तोंडाची अस्वच्छता हेच फक्त दुर्गंधी येण्याचं कारण नाहीये.
तोंड स्वच्छ धुतले तरी येतो वास:
फुप्फुस:(Lungs)
फुप्फुसात कफ झाल्याने तोंडातून कफ बाहेर पडतो. तेव्हा तोंडात दुर्गंधी पसरते. त्यामुळे तोंडाची आणि दाताची नीट साफसफाई केली तरीही तोंडाला वास येतच राहतो.
यकृत(Liver):
यकृताचा आजारदेखील श्वासांच्या दुर्गंधीसाठी कारणीभूत ठरू शकतो. साखरेची पातळी नियंत्रित करण्याचं काम लिव्हर करत असतं. जेव्हा त्यावर दाब येतो तेव्हा विषारी घटक अधिक प्रमाणात निर्माण होऊ लागतात.
मूत्रपिंड/किडणी (kidney):
जर तुम्हाला किडणीशी संबंधित काही विकार असेल, तर त्यामुळे तोंड कोरडं पडायला सुरुवात होते. किडणीचं कार्य सुरळीत सुरू असेल, तर युरिया (लघवी) फिल्टर(स्वच्छ) करण्याचं काम नीट सुरू राहतं. मात्र त्यात काही विकार निर्माण झाला, तर या कामात अडथळे येऊ लागतात.
इतर कारणामुळे तोंडाला दुर्गंधी वास येतो:
रक्तातील साखरेची पातळी वाढत चालल्याचं हे प्राथमिक लक्षण मानलं जातं. या अवस्थेत तोंडातून ॲसिटोनसारखा दुर्गंध यायला सुरुवात होते. अशा वेळी तातडीने रक्तातील साखरेची पातळी तपासण्याचा सल्ला दिला जातो. योग्य वेळी तपासणी केली, तर गंभीर स्वरुपाचा मधुमेह होण्यापासून बचाव करता येऊ शकतो.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: