शासन निर्णय

Mothers Name| महत्त्वाचा निर्णय! आता सातबारावर आईचं नाव नक्कीच! वाचा सविस्तर बातमी…

Mothers Name| मुंबई, २९ मे २०२४: महिलांसाठी एक आनंदाची बातमी! भूमी अभिलेख विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्यानुसार आता विविध कागदपत्रांसह, सातबारावरही अर्जदाराच्या आईचं नाव नक्कीच समाविष्ट केलं जाईल.

१ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी

हा निर्णय १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी लागू होईल. या तारखेनंतर जमीन किंवा सदनिका खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावात आता आईचं (lifestyle) नावही समाविष्ट असेल. भूमी अभिलेख विभाग सध्या यासाठी संगणक प्रणाली विकसित करत आहे आणि पुढील सहा महिन्यांत या योजनेची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे.

वाचा :Astrology | मंगळाच्या राशिचक्रातील वर्तनामुळे ‘महा दरिद्र योग’: या 5 राशींना होणार आर्थिक टंचाई आणि त्रास!

आईचं नाव कसं लावता येईल?

आईचं नाव सातबारावर नोंदवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. यात आई असल्याचा पुरावा आणि तलाठी कार्यालयातून मिळवलेली शहानिशा यांचा समावेश आहे.

विवाहापूर्वीचं नावही नोंदवता येईल

या निर्णयानुसार, महिला लग्नानंतर (lifestyle) बदललेलं नाव नोंदवण्याऐवजी विवाहापूर्वीचं नाव (marriage) ही सातबारा उताऱ्यावर नोंदवू शकतील.

१ मे २०२४पूर्वी जन्मलेल्यांसाठी

१ मे २०२४पूर्वी जन्मलेल्या व्यक्ती जर आपल्या आईचं नाव सातबारावर नोंदवू इच्छित असतील तर त्यांनाही आईची ओळख पटवून देणारा पुरावा जमा करावा लागेल.

*हा निर्णय महिलांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण त्यामुळे त्यांच्या मालकी हक्कांना अधिक मजबूती मिळेल आणि लिंगभेद दूर होण्यास मदत होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button