योजना

Aai Yojana| आई’ पर्यटन धोरणाचा लाभ महिलांनी घ्यावा पर्यटन विभागाचे आवाहन|

Aai Yojana| पुणे, 8 जुलै 2024: पर्यटन क्षेत्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना उद्योजक बनण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवले आहे. या धोरणाचा लाभ घेण्यासाठी पुणे विभागातील महिलांनी पढे येण्याचे आवाहन पर्यटन विभागाचे उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे.

या योजनेला चार महिने उलटले तरीही, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. योजनेची जनजागृती न झाल्याने आणि राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचली नसल्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

वाचा:o keep calm| साडेसातीच्या कठीण काळात शांत राहण्याचे 10 सोपे उपाय|

‘आई’ योजनेचे फायदे:

 • महिलांना पर्यटन व्यवसायासाठी 15 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध
 • कर्जाच्या 12% व्याजाचे हप्ते पर्यटन विभागामार्फत भरणे
 • महिला उद्योजकता विकासावर भर
 • पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना
 • महिला पर्यटकांसाठी सवलती आणि सुविधा
 • प्रवास आणि पर्यटन विकासासाठी मदत

कोणत्या महिलांना मिळेल लाभ?

 • ज्यांचा पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत आहे
 • व्यवसाय महिलांच्या मालकीचा आणि त्यांच्याकडून चालवला जाणारा असावा
 • हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये महिलांची मालकी आणि 50% व्यवस्थापकीय आणि इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक
 • टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये 50% कर्मचारी महिला असणे आवश्यक
 • पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असणे आवश्यक

अर्ज कसा करावा?

महिला अर्जदारांना पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://maharashtratourism.gov.in/ ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.

पर्यटन विभागाचा आवाहन:

शमा पवार यांनी महिलांना ‘आई’ पर्यटन धोरणाचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या धोरणामळे महिलांना आर्थिक सक्षम बनण्यास आणि पर्यटन क्षेत्रात यशस्वी होण्यास मदत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button