कृषी सल्ला

मान्सून अपडेट : राज्यात अनेक ठिकाणी पूर्व मान्सून पावसात सुरुवात तर अजून दोन-तीन दिवसात ‘या’ जिल्ह्यात बरसणार पावसाच्या सरी…

Monsoon Update: If pre-monsoon rains start in many parts of the state, it will rain for another two-three days.

हवामान विभागाचे अधिकारी होसळीकर (Hoslikar, an official of the Meteorological Department) यांच्यामते सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, लक्षद्विप आणि केरळातील उर्वरित भागासह दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळाडूच्या भागांमध्ये असून, अरबी समुद्र मार्गे येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रातसह गोव्यामध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

त्यादरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी पूर्व मोसमी (Pre-seasonal) पावसाची सुरुवात झाली आहे त्यामुळे नागरिकांची व शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

हेही वाचा :लाखभर पगाराचं नोकरी सोडून द्राक्षाच्या शेतीमध्ये रमला राजीव यांची यशोगाथा…

[metaslider id=4085 cssclass=””]

‘या’ भागात पडला पूर्व मोसमी पाऊस…
पिंपरी चिंचवड भागात पावसाने दुपारी तीनच्या दरम्यान हजेरी लावली, गरमीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना बरे वाटले, या पावसामुळे हवामानामध्ये गारवा निर्माण झाला आहे.

नाशिकसह, धुळे,रत्नागिरी, गडचिरोली या भागांमध्ये देखील पावसाच्या सरी बरसल्या आहेत. नांदेड येथे झालेल्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा : नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्याकरता ‘या’ योजनेतून मिळवा अनुदान, असा करा, “ऑनलाईन” अर्ज…

‘या’ जिल्ह्यात बरसणार्‍या पावसाच्या सरी
2 ते 3 दिवसांत राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, रायगड, द. कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असून सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा :


1)लाखभर पगाराचं नोकरी सोडून द्राक्षाच्या शेतीमध्ये रमला राजीव यांची यशोगाथा…

2)नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्याकरता ‘या’ योजनेतून मिळवा अनुदान, असा करा, “ऑनलाईन” अर्ज…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button