दरवर्षीच्या बाजार भावापेक्षा अधिक या वर्षी सोयाबीन (Soybeans) च्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, अवकाळी पाऊस, तसे अन्य नैसर्गिक कारणामुळे सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे सोयाबीनचे दर मध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली, त्यामुळे जर तुम्ही सोयाबीन पेरणी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच या सदराची तुम्हाला मदत होईल,
पेरणी: (Sowing)
पेरणी खरीपात जुनच्या पहिल्या पंधरवड्यात वापशावर करावी. पेरणी ४५ X ०.५ सें.मी. (भारी जमीन) किंवा ३० X १० सें.मी. (मध्यम जमीन) अंतरावर करावी.
सुधारित वाण: (Improved varieties:)
जे.एस.३३५, एम.ए.सी.एस.११८८, फुले कल्याणी (डी.एस.२२८), जे.एस.९३०५, के.एस. १०३, फले अग्रणी (केडीएस ३४४)
बीज प्रक्रिया: (Seed processing)
बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डेझीम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. तसेच नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबियम २५० ग्रॅम + स्फुरद विरघळणारे जीवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे.
आंतर पीक: (Inter-crop:)
सोयाबीन + तूर (३:१) या प्रमाणात घ्यावे.
खते: (Fertilizers)
भरखते : चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० गाड्या वापरावे.
वरखते : सोयाबीन पिकास हेक्टरी ५.० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.
मशागत: (Cultivated)
तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी पेंडिमेथॅलीन १.० ते १.५ किलो क्रियाशील घटक ६०० ते ७०० लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे. पीक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी व नंतर खुरपणी करुन शेत तणमुक्त ठेवावे. अथवा पीक उगवणीनंतर २१ दिवसांनी प्रति हेक्टरी इमॉजिथॅपर क्रियाशील घटक ०.१ ते ०.१५ किलो ५०० ते ६०० लिटर पाण्यामध्ये मिसळून तणांवर फवारावे.
पाणी व्यवस्थापन: (Water management)
पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी), फुलो-यात असतांना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी) पावसाने ताण दिल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
रोग: (Disease)
तांबेरा या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके येतात व पाने तपकिरी पडतात. आर्द्रतायुक्त हवामान, वारा, रोपांची जास्त संख्या यामुळे पिकात हवा खेळण्याचे कमी झालेले प्रमाण या बाबी रोगास आमंत्रित करतात. ब-याचवेळा अकाली पानगळ होते. दाण्यांच्या वजनात लक्षणीय घट होते व हेक्टरी उत्पादन घटते. तांबेरा प्रभावित भागात (सांगली, कोल्हापूर व सातारा) पेरणी शक्यतो १५ मे ते २५ जुनच्या दरम्यान करावी. फुले अग्रणी कल्याणी सारख्या या रोगास बळी न पडणा-या, जातीचा वापर करावा. प्रोपीकोनझॉल यापैकी एखादे बुरशीनाशकाची फवारणी १ लिटरला १ मिली या प्रमाणात करावी. पिकाच्या अवस्थेनुसार १-२ फवारण्या १५ दिवसाचे अंतराने गरजेनुसार घ्याव्यात.
काढणी: (Harvesting)
सोयाबीन शेंगांचा रंग पिवळट तांबुस झाल्यानंतर, जातीच्या पक्वतेच्या ९० ते ११० दिवसांत काढणी करावी. पीक काढणीस उशीर झाल्यास शेंग फुटण्यास सुरुवात होते.
हे ही वाचा :
1)बीड मधील युवकाची कमाल! ढोबळी मिरचीतून तीन महिन्यात मिळवले, सात लाख रुपये वाचा : सविस्तर बातमी…
2)जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित दर…