हवामान

Monsoon | महाराष्ट्रात हळूहळू मान्सून सक्रिय, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी काय काळजी घ्यावी आणि पेरणी कधी करावी?

Farmer |मुंबई, 10 जून: राज्यात हळूहळू मान्सून सक्रिय होत आहे. कोकणानंतर आता मुंबईतही मान्सून दाखल झाला आहे. 15 जूनपर्यंत राज्याच्या सर्व भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पेरणीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पेरणी करायची की नाही? हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

वाचा:Career Guidance | १२वी नंतर कोणत्या क्षेत्रात करियर करावं? १२वी नंतर सर्वोत्तम नोकरी संधी कोणत्या फील्ड मध्ये…

याबाबत हवामान अभ्यासक आणि कृषी तज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या मते, शेतकऱ्यांनी खात्रीच्या ओलीवरच आणि सिंचनाची काही सोय असल्यासच 20 जून दरम्यान पेरणी करावी.

खुळे यांनी काय म्हटले?

  • 15 जूनपर्यंत झालेल्या पावसावरच चांगल्या प्रतीच्या जमिनीत आणि जिथे 10 सेमी. चांगली ओल साध्य झाली असेल अशाच ठिकाणी पेरणी करावी.
  • 20 जून दरम्यान पेरणी केल्यास पेर-उतार नंतर पीक रोप 30 ते 40 दिवस दम धरेल.
  • 15 जूननंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फार सावधगिरीने आणि संयमाने पेरणी करावी.

कृषी तज्ञांचा सल्ला

  • 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत पेरणीची घाई करू नये.
  • दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.
  • शेतात तीन ते चार इंच ओल निर्माण होईपर्यंत पेरणी करू नये.
  • चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button