Rare News: अश्मयुगीन काळात माकड होती हे सर्वांना इतिहासात शिकवलं असेलच. तेव्हा हीच माकड कंदमुळे, फळे खात आणि उदरनिर्वाह चालवत असायचे. बदलत्या काळानुसार माकडाचा माणूस झाला. सध्याच्या युगात माणसाकडे स्वतःच घर किंवा फार अशी जमीन नाहीये पण आताच्या परिस्थितीत माकडांनी 32 एकर जमिनीचा मालकीहक्क बजावलाय.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उपला या गावातील ही घटना आहे. माणसांप्रमाणे माकडांना सामाजिक कार्यक्रमात, लग्न समारंभात त्यांना माणसांसारखा मान सन्मान दिला जातो. उपला ग्रामपंचयतीच्या भूलेखात त्यांच्या देखील नावांचा स्पष्टपणे उल्लेख आहे.
सरपंचांनी सांगितलं याबाबत :
सरपंच म्हणाले की काही वर्षांपूर्वी भूतकाळात हे गाव माकडांच होत. एकूण 100 माकडांची घरे या गावात आहेत. पुढं ते म्हणाले की परंतु आता माकडांची संख्या कमी होत चाललीये. त्याच कारण म्हणजे माकड एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरण करतात.
वनविभागाने 32 एकर जमिनीवर झाडे लावली आहेत. याआधी त्या ठिकाणी घर होते. आता तेच घर परिपूर्ण खचून गेलं. लोक लग्न समारंभावेळी पूर्वी माकडांना भेटवस्तू देत असत. परंतु आता ती प्रथा फार कमी लोक पाळतात. पण ही माकड दारावर येतात तेव्हा लोक त्यांना काहीना काही तरी देतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: